ETV Bharat / state

Prakash Ambedkar : पंधरा दिवसात राज्यात मोठा राजकीय बॉम्बस्फोट, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ - Prakash Ambedkar statement

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारबाबत मोठे विधान केले आहे. येत्या पंधरा दिवसात राज्यात मोठा राजकीय बाॅम्बस्फोट होणार असल्याची शक्याता त्यांनी वर्तवली आहे. त्यांच्या हस्ते आज पुण्यात बा भिमा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Apr 16, 2023, 6:42 PM IST

राज्यात मोठा राजकीय बाॅम्बस्फोट होणार - प्रकाश आंबेडकर

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच पुन्हा एकदा राज्यात सत्तांतर होणार की काय अशी परिस्थिती सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक भाकीत केला आहे. ते म्हणाले की 15 दिवसात भल मोठ राजकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेव्हा आपण 15 दिवसांची वाट पाहूया. दोन ठिकाणी मोठं बॉम्बस्फोट होईल असे यावेळी आंबेडकर म्हणाले. बा भिमा या पुस्तकाचं प्रकाशन वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

बंदूकीच्या जोरावर राज्य सरू : आंबेडकर यांना काल झालेल्या गोळीबार प्रकरणी विचारले असता ते म्हणाले की मुंबईमध्ये सुद्धा अंडरवामल्डची भांडणे देखील बंदुकीच्या सह्य्याने कोर्टात सुरू होती. आत्ता तोच फंडा योगीने सुरू केलेला आहे. कायद्याने नव्हे तर, गोळ्या घालून आळा घाला, अशी परिस्थितीती आहे. उत्तर प्रदेशमधील सरकारला आधीच न्यायालयाने कायद्याने राज्य चालवा अश्या सूचना दिल्या आहे. पण अस असताना देखील कायद्याने राज्य चालवण्याऐवजी बंदूकीच्या जोरावर राज्य चालवले जात असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

परिस्थितीती बेकाबु होण्याची शक्यता : तसेच काल अखिलेश यादव यांनी जे विधान केले आहे, ते देखील महत्त्वाचे आहे. पाहिले डकेतांना डकेत बोललं जात होत. पण कालची घटना बघितली तर डकेतला त्याच्या जातीने बोललं जात आहे. कालची परिस्थितीती पाहता तेथील परिस्थितीती बेकाबु होईल की काय अशी परिस्थितीती निर्माण झाली आहे, अस देखील यावेळी आंबेडकर म्हणाले. महाराष्ट्र भूषणची सध्या बरीच चर्चा आहे. हा पुरस्कार विशिष्ट समाजातील व्यक्तीलाच दिला जातो. याबाबत आंबेडकरांना विचारले असता ते म्हणाले की, कोणाला पुरस्कार देणे हा सरकारचा अधिकार आहे, कोणाला नाही असेही आंबेडकर म्हणाले.

राजकारणासाठी जवानांचा बळी ? : पुलवामाबाबत आंबेडकर म्हणाले, पुलवामाबाबत त्यावेळी मी बोललो होतो. जी गाडी ब्लास्ट केली त्याला प्रोटेक्शन नव्हतं. एखादी माहिती मला मिळते तर सरकारलाही मिळू शकते. पण सरकारला राजकारण करायच होत. दहा गाड्या कॅनॉव्ह बद्दलची साधी बाबा कॉन्स्टेबलला माहिती आहे. ती बाब यांना माहिती नसावी. त्यामुळे साधी यांची चौकशी सुद्धा नाही, राजकारणासाठी या जवानांचा बळी दिलाय का अस प्रश्न उपस्थित होतो, अस देखील यावेळी आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा - Sharad Pawar On Atiq Ashraf Murder : अतिक- अश्रफ हत्येबाबत शरद पवार म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.