ETV Bharat / state

पुण्यात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश - Mumbai Police Cyber Crime Branch

मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ( Mumbai Police Cyber Crime Branch ) पुण्यात नोकरीचे आमिष दाखणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश ( international job-baiting racket exposed ) केला आहे.

international
international
author img

By

Published : Nov 30, 2022, 8:36 PM IST

मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने ( Mumbai Police Cyber Crime Branch ) पुण्यात मोठी कारवाई केली आहे. नोकरीचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश सायबर गुन्हे शाखेने पुण्यात केला ( international job-baiting racket exposed ) आहे. याप्रकरणी आयपीसी कलम 419, 420, 468, 471, 120 ब तसेच माहिती, तंत्रज्ञान कायदा 2008 कलम 66 ड, 66 क, परदेशी नागरिक कायदा 1946 कलम 14 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चार परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

२६ लाख ३७ हजार ४७३ रु. फसवणुक - झांबिया, युगांडा, नामोबिया, घाना या देशांतील हे चार नागरिक आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून दोन पुरुष आरोपी आहेत. या कारवाईत पोलिसांनी 13 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल, चार लॅपटॉप, वेगवेगळ्या देशांचे पासपोर्ट आणि तीन इंटरनेट राउटर जप्त केले आहेत. :या गुन्हयातील फिर्यादी David J Ranz असे नाव धारण करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच hinvisamumbai@cis-usembassy.in, careers@whitingturners.com या ईमेल आयडीच्या वापरकर्त्यांनी फिर्यादी यांना ते US Embassy येथे काम करत असल्याचे भासवून फिर्यादी यांना United States Of America येथे नोकरी देण्याचे अमिष दाखवण्यात आले होते. त्यांनी वेळोवेळी यातील नमुद बँक खात्यामध्ये एकूण रुपये २६ लाख ३७ हजार ४७३/- रुपये एवढी भरण्यास सांगून आर्थिक फसवणुक केली.

चौघांना अटक - या गुन्हयाचा तांत्रिक तपास करून सांगवी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड, लोणीकाळभोर पोलीस ठाणे, पुणे यांचे हद्दीतून आफीका खंडातील झांबिया, युगांडा, नामिबीया, घाना या देशातील एकूण २ पुरूष, २ महिला आरोपींना अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या तपासादरम्यान यातील आरोपीतांनी फिर्यादी यांची रक्कम ज्या बँक खात्यात वळती केली ते बँक खाते, तसेच संगणकीय साधने जप्त करण्यात आली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.