ETV Bharat / state

चिंतेची बाब..! रुग्णालयातून पळाला कोरोनाग्रस्त, प्रशासन झालं होतं त्रस्त - कोरोनाग्रस्त

थायलंड येथून आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाला होता. त्याने घाबरुन रुग्णालयातून पळ काढला होता. पण, पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन घरच्यांशी बोलून त्याला बोलवायला सांगितले. त्यानंतर त्याची समजून काढून पून्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

कोरोनाग्रस्ताला पकडताना पोलीस पथक
कोरोनाग्रस्ताला पकडताना पोलीस पथक
author img

By

Published : Mar 16, 2020, 11:06 PM IST

Updated : Mar 16, 2020, 11:51 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमधून कोरोनाग्रस्ताने रुग्णालयातून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याला काही तासांनी फिल्मीस्टाईल पकडण्यात भोसरी पोलिसांना आणि डॉक्टरांना यश आले आहे. पलायन केल्यानंतर संबंधित रुग्ण हा मित्राला भेटला होता, असे ही पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे मित्राची कोरोना विषाणूची चाचणी केली असता, तो बाधित नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही घटना शनिवारी (दि. 14 मार्च) घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. कोरोना बाधित रुग्णाला पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थायलंड येथून आलेला व्यक्तीला भोसरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. डॉक्टर फॉर्म भरून घेत असताना संबंधित रुग्णाला आपण कोरोना बाधित असल्याचे समजले. रुग्ण घाबरला होता, त्यामुळे रुग्णाने डॉक्टरांची नजर चुकवून त्या ठिकाणाहून पलायन केले. घटनेनंतर डॉक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांची धावपळ झाली. याची माहिती भोसरी पोलिसांना देण्यात आली. तेव्हा, वरिष्ठ अधिकारी राम जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे आणि पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे यांनी कर्मचाऱ्यांसह तपास सुरू ठेवला.

कोरोनाग्रस्ताने मित्राची दुचाकी घेत शहरात फेरफटका मारला होता. भोसरी पोलीस आणि डॉक्टरांचे पथक हे रुग्णाच्या घरी पोहोचले. त्यांना त्या रुग्णाबाबत माहिती विचारली आणि फोन करण्यास सांगितले. त्यावेळी फोन करून रुग्णाला घराजवळ बोलवण्यात आले. घराबाहेर येताच रुग्णाला पोलिसांनी घेराव घालत त्याला रुग्णवाहिकामधून पुन्हा भोसरी येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या प्रकरणानंतर भोसरी येथील रुग्णालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या अफवा पसरवणाऱ्यांवर पुणे पोलिसांची कारवाई; एकास अटक, एक अल्पवयीन ताब्यात

Last Updated : Mar 16, 2020, 11:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.