पुणे: उमेदवारी देण्यासाठी दाऊद इब्राहिमने उद्धव ठाकरे यांचा मोबाईल नंबर आणि लँडलाईन नंबर सुद्धा मागून घेतला. त्यानंतर फोनवरून त्या दोघांचे बोलणे झाले. त्या बोलण्यामध्ये उद्धव ठाकरेने दिपाली सय्यद यांना असे सांगितले की, तुम्ही एवढ्यावर जायला नको होते. उमेदवारीसाठी अशा प्रकारचे संभाषण त्या दोघात झाल्याचे सुद्धा भाऊसाहेब शिंदे यांनी म्हटले आहे. भाऊसाहेब शिंदे यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे.
भाऊसाहेब शिंदेनी केला आरोप: दिपाली सय्यद या अगोदर आम आदमी पक्षात होत्या. त्या अहमदनगर मधून अहमदनगर आधार 14 ला लोकसभा लढली. त्यानंतर तर त्याने विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षात प्रवेश करून, श्रीगोंद्यामधून उमेदवारी मागितली होती. पण त्या ठिकाणाहून त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यानंतर त्यानी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या मदतीने प्रवेश करून मुंब्रा कळवा मधून निवडणूक लढवली होती. तसेच 65 लाख आणि 45 लाखाचे दोन ट्रांजेक्शन स्वतः दिपाली सय्यद यांच्या अंधेरी येथील शाखेतून रश्मी उद्धव ठाकरे यांच्या अकाउंटला पैसे गेले असल्याचा आरोप सुद्धा भाऊसाहेब शिंदेने केला आहे. आज बरोबर दिपाली सय्यद आणि दाऊद इब्राहिमची पत्नी यांचे सातत्याने फोनवरून बोलणे होत असते. दाऊत इब्राहिम आणि उद्धव ठाकरे यांचे सुद्धा संबंध असल्याचे भाऊसाहेब शिंदे यांनी म्हटले आहे.
दिपाली सय्यद आणि दाऊद इब्राहिमची पत्नी यांचे सातत्याने फोनवरून बोलणे होत असते. दाऊत इब्राहिम आणि उद्धव ठाकरे यांचेही संबंध - भाऊसाहेब शिंदे
चार कोटी रुपयांची मागणी : त्यासंदर्भातलेच हे सगळे आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी आज केले आहेत की, उमेदवारी भरायला दोन दिवस अगोदरच दिपाली सय्यद यांना चार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यावेळी नगर विकास मंत्री होते, ते त्यांना घेऊन मातोश्रीवर गेले. त्या ठिकाणी 65 लाख आणि 45 लाखाचे दोन ट्रांजेक्शन झाले, त्यानंतर मात्र पैशाची तडजोड होत नव्हती. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी तिकीट देण्यास नकार दिला. त्याच वेळेस दिपाली सय्यद यांनी दाऊदची पत्नी मेहसबिन हिला कॉल केला. त्यानंतर त्याने बडे से बात करू असे म्हणत दाऊद बोलणे करून दिले. दाऊद उद्धव ठाकरे यांचा फोन नंबर लँडलाईन व्हाट्सअप घेतला. त्यानंतर लगेच रात्रीच्या वेळेस आम्हाला मातोश्रीवर बोलवण्यात आले, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदेने केला आहे.
उमेदवारी भरायला दोन दिवस अगोदरच दिपाली सय्यद यांना चार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. मातोश्रीवर 65 लाख आणि 45 लाखाचे दोन ट्रांजेक्शन झाले - भाऊसाहेब शिंदे
दिपाली सय्यदला पाठीशी घालत आहे: या सगळ्या उमेदवारीच्या संदर्भात दिपाली सय्यद, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असा त्रिकोण तयार होत आहे. परंतु आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दिपाली सय्यदला पाठीशी घालतात. त्याचबरोबर देशद्रोह्याशी संबंध ठेवून उद्धव ठाकरे सुद्धा काहीतरी घातपात करू शकतात. असा माझा आरोप असल्याचे भाऊसाहेब शिंदे यांनी म्हटल्याने आता राजकीय वर्तुळामध्ये मात्र भुवया उंचावलेल्या आहेत. हे आरोप खरे आहेत का? उद्धव ठाकरे यांच्याकडून काही उत्तरे येत का हे पहावे लागेल.
हेही वाचा -
- Mahila Maharashtra Kesari महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खासदार ब्रिजभूषण सिंह यांना बोलावल्याने वाद दिपाली सय्यद यांनी कार्यक्रमाकडे फिरविली पाठ
- Deepali Sayyad critics नीलम गोऱ्हे सुषमा अंधारे ह्या तर चिल्लर मुख्य सुत्रधार रश्मी ठाकरे दिपाली सय्यद
- Deepali sayyad अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे दाऊद गॅंगशी संबंध माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट