ETV Bharat / state

World aids day : बारामतीतील शासकीय उपजिल्हा रुग्णालय एड्सग्रस्तांसाठी ठरतंय संजीवनी, बाधितांसाठी 'या' आहेत योजना - एड्स उपचार सिल्वर जुबली रुग्णालय

बारामती येथील सिल्वर जुबली शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील 'एआरटी' विभाग एड्स ग्रस्त रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. या विभागाने मागील पाच वर्षांत तब्बल २० हजारांहून अधिक नागरिकांची एचआयव्ही तपासणी केली आहे. यामध्ये ७३२ जण एचआयव्ही बाधित आढळून आले आहेत.

Womens Hospital Baramati
महिला रुग्णालय बारामती
author img

By

Published : Dec 1, 2021, 1:48 AM IST

पुणे - बारामती येथील सिल्वर जुबली शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील 'एआरटी' विभाग एड्स ग्रस्त रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. या विभागाने मागील पाच वर्षांत तब्बल २० हजारांहून अधिक नागरिकांची एचआयव्ही तपासणी केली आहे. यामध्ये ७३२ जण एचआयव्ही बाधित आढळून आले आहेत. तसेच, २०१८ ते २०२१ मध्ये १३ बाधित बालकांना उपचाराअंती बरे केले आहे.

माहिती देतान डॉक्टर सदानंद काळे

हेही वाचा - Etv Bharat Special : हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूदर कमी करणारे कार्डियाक किट

काय आहे एचआयव्ही?

एचआयव्ही म्हणजे 'ह्यूमन इम्युनोडेफिशियन्शी व्हायरस' होय. हा व्हायरस व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. एचआयव्ही बाधिताची हेळसांड न करता कॉलरा, मलेरिया, कर्करोग, क्षयरोग आदी आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांकडे आपण जसे बघतो तसाच दृष्टिकोण एचआयव्ही बाधित रुग्णांकडे ठेवणे गरजेचे आहे.

बारामती शासकीय उपजिल्हा रुग्णालयात असणाऱ्या 'एआरटी' विभागात बारामतीसह पुरंदर, इंदापूर, बार्शी, सोलापूर, दौंड, भोर, शिरूर, करमाळा, माळशिरस आदी भागांतील रुग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी रुग्णांवर सर्व प्रकारचे मोफत उपचार केले जातात. एक्स - रे, लॅब तपासण्या, सोनोग्राफी, आवश्यक औषधे विनामुल्य दिले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 'एआरटी' विभागाकडून बाधित रुग्णांवर उपचारांबरोबरच त्यांचे मनोबल वाढविण्याचे कामही केले जाते. त्यामुळे, हा विभाग एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे.

कोरोना काळातही एचआयव्ही बाधित रुग्ण औषध उपचारांपासून वंचित राहणार नाही, यासाठी 'एआरटी' विभाग नियमित सुरू होता. शिवाय बहुतांशी बाधित रुग्णांना कोरोना लसीकरणही करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. या रुग्णालयात एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी असणाऱ्या विभागात वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवती संत, समुपदेशक संदीप राऊत, औषध उपचारतज्ज्ञ मनीषा माने, प्रयोग तज्ज्ञ रुपाली डेंगले, माहिती व्यवस्थापक अभिजीत पवार, परिचारिका सुप्रिया पवार आदींकडून योग्य उपचार केले जातात.

सिल्वर जुबली शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय असल्याने हे केंद्र वर्षभरापासून महिला रुग्णालय बारामती येथे चालवत असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे यांनी दिली.

बाधित रुग्णांसाठी या आहेत योजना

- संजय गांधी निराधार योजना

- अंत्योदय योजना

- एसटी व रेल्वे प्रवासात सुट

- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा

- प्रधानमंत्री सुरक्षा विमा

- बाल संगोपन योजना

- अटल पेन्शन योजना

बालकांचा संसर्ग टाळता येऊ शकतो

एचआयव्ही बाधित गर्भवती मातेकडून बालकाला एचआयव्ही संसर्ग होऊ नये याकरिता तिला 'एआरटी'ची उपचार पद्धती देण्यात येते. बाळ जन्मानंतर ७२ तासांच्या आत व ६ आठवडे नेव्हीरँपीन औषध दिल्याने मातेकडून गर्भाला होणारा एचआयव्ही संसर्ग टाळता येऊ शकतो.

खचून जाऊ नये

एड्स होऊ नये यासाठी दक्ष राहिले पाहिजे. यासाठी आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना माहिती देण्यात येते. दुर्दैवाने एखाद्याला एड्स झालाच तर, अशा रुग्णाने खचून जाऊ नये, त्यावर सध्या प्रभावी औषध उपलब्ध असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे यांनी सांगितले.

हेही वाचा - Pune Film Festival - पिफ 2021 ची घोषणा, अभिनेते अशोक सराफ यांना मिळणार 'पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.