पुणे: पैश्यासाठी कोण काय करणार हे कोणालाच सांगता येणार आहे. अशीच एका बँक उपव्यवस्थपकाने पैशांच्या हावसाठी एक डाव रचला आणि तो फसला आहे. पैशांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या उपव्यवस्थापकानेच पदाचा गैरवापर करीत तब्बल 2 कोटींची रोकड साथीदारांच्या मदतीने एका कंपनीला देण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित कंपनीकडून चॅरिटेबल संस्थेच्या नावे अधिकची देणगी प्राप्त करून विभागून घेणे तिघांच्या अंगलट आले आबे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट चारने तिघांना अटक करत त्यांच्याकडून 2 कोटींची रोकड जप्त केली आहे.
एसजीएस मॉल परिसरात आरोपीना अटक: अमोल गोरखनाथ कंचार (वय 45, रा. गारखेडा परिसर, संभाजीनगर), संतोष वैजनाथ महाजन (वय 43, रा. नाशिक) आणि सुशील सुरेश रावले (वय 34, रा. मंचर, ता. आंबेगांव), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांना गोपनीय बातमी मिळाली की, काही इसम पांढ-या रंगाच्या कार मधुन बनावट नोटा घेवुन पुण्यातील एस. जी. एस मॉल परिसर कैम्प पुणे येथे येणार आहेत. युनिट-४ कडील पोलीस स्टाफने एसजीएस मॉल परिसरात सापळा रचुन लक्ष ठेवून असताना बातमीतील वर्णनाची कार येताना दिसली. परंतु ती कार तेथे न थांबता पुढे गेली. ती कार अली सोमजी पेट्रोल पंपावे लगत असलेल्या वेलस्ली रोड कैम्प, पुणे येथे येवुन थांबली.
डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत: कार थांबताच युनिट ४ कडील पोलीस स्टाफने त्या कारला घेराव घालून कारमधील आरोपींना पकडले. पथकाने कारची पाहणी केली असता, त्यामध्ये दोन बॅगमध्ये भारतीय चलनाच्या ५०० व २००० रुपये दराच्या नोटांचे बंडल एकूण २ कोटी रुपये रोख रक्कम मिळून आली आहे. अटक आरोपीपैकी सुशील रावले हा बैंक ऑफ महाराष्ट्र, मेयर करन्सी चेस्ट ता. आंबेगाव, जि. पुणे येथे डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. जप्त करण्यात आलेली रोख ही मंचर करन्सी बेस्टया डेप्युटी मॅनेजर सुशिल रावले याने त्याचे पदाचा गैरवापर करून मेघर करंसी चेस्टमधून अनअधिकृतपणे आणली असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी जवळ असलेली कैश ते मोठ्या कंपनीला देवुन त्यांच्याकडून आरोपींनी दिलेल्या कॅश मोठी रक्कम अमोल कंधार याचे कचार फौडेशन' चॅरीटेबल ट्रस्टच्या अकाऊंटवर डोनेशन आरटीजीएस करून घेणार होते.
शिक्षण संस्थेच्या बांधकामाचा ठेका: चॅरिटेबल ट्रस्टला डोनेशन रुपाने मिळालेल्या जास्तीच्या रक्कमेपैकी काही रक्कम ते आपआपसात वाटून घेणार होते. उरलेल्या डोनेशनच्या रक्कमेमधून आरोपी अमोल कंधार हा शिक्षण संस्थेच्या इमारतीचे बांधकाम करणार होता. पण या कामामध्ये आरोपी संतोष महाजन सर्वोतोपरी मदत करत असल्यामुळे आरोपी अमोल कंचार हा त्याच्या शिक्षण संस्थेच्या बांधकामाचा ठेका तसेच डोनेशन रुपाने प्राप्त झालेल्या रक्कमेमधील काही हिस्सा आरोपी संतोष महाजन यास देणार होता.
रक्कमेबाबत अधिक माहिती घेतली: या २ कोटी रुपये रक्कमेच वापर करून कंपनीकडून आरोपी अमोल कैवार याचे चॅरिटेबल ट्रस्टचे खात्यावर डोनेशनची मोठी रक्कम प्राप्त होताच, आरोपी अमोल कंचार हा प्राप्त रकम पैकी २ कोटी रुपये बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा मंचर करन्सी चेस्ट यांचे खात्यावर आरटीजीएस करणार होता. बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा मंचर करन्सी चेस्ट यांचेशी संपर्क साधून तपासात निष्पन्न बाब खात्री केली असता, आरोपी सुशिल सुरेश रावले हा सदर बँकेत करन्सी चेस्ट डेप्युटी मॅनजर असल्याची माहिती प्राप्त झाली. आरोपींना ताब्यातून जप्त रोख रक्कमेबाबत अधिक माहिती घेतली आहे. तो रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया या बँकेने बँक ऑफ महाराष्ट्र, मंचर करन्सी चेस्ट शाखेत महाराष्ट्र बँकेच्या २६ शाखा व इतर बँकांना केशचा पुरवठा करणे कामीसाठा करून ठेवलेल्या रक्कमेपैकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी रावले याने त्याचे पदाचा व अधिकाराचा गैरवापर करुन अनाधिकराने, बेकायदेशिररित्या बँक ऑफ महाराष्ट्र मंचर करन्सी बेस्ट शाखा, ता. अविगांव जि. पुणे या शाखेतील रोख २ कोटी रुपये यातील आरोपी अमोल कतार व आरोपी संतोष महाजन याच्यासोबत बेकायदेशीर काम करण्याकरीता कब्जात बाळगली असल्याचे निष्पन्न झाले आहे.