पुणे - शहरात गुरुवारपासून मॉल आणि मल्टीप्लेक्समध्ये पार्किंग शुल्क आकारण्यावर महापालिकेने बंदी घातली आहे. सर्व मॉल आणि मल्टीप्लेक्स धारकांना महापालिकेने यासंदर्भात नोटीसा दिल्या आहेत.
मॉल आणि मल्टीप्लेक्समध्ये पार्किंग शुल्क आकारण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जर कुणी नागरिकांकडून पार्कींगसाठी पैसे घेतले तर त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी दिली आहे.
पुणेकरांनी कुठल्याही मॉलमध्ये पार्किंग शुल्क देऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान महापालिकेच्या या धोरणानंतर मॉलधारक पार्कींगसाठी पैसे आकारणार का? हा खरा प्रश्न आहे.
गुरुवारी काही मॉलमध्ये पार्कींग मोफत ठेवण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मॉलमध्ये पार्कींग करण्यासाठी दुचाकीला 20 रुपये ते 30 तर चार चाकीला 30 ते 50 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. त्यामुळे आता महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना या शुल्कातून सुटका मिळणार आहे.