बारामती - इंदापूर व बारामती तालुक्यात बाळा दराडे टोळीने दहशत माजवली होती. या टोळी विरोधात भिगवण, वालचंदनगर, बारामती शहर- तालुका, आदी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल होते. भिगवण पोलीस ठाण्याने दाखल केलेल्या प्रस्तावानुसार विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या टोळीला मोक्का लावला होता. यातील दराडे व गोफणे यांना बारामती तालुका पोलिसांनी नाशिकमधून अटक केली होती.
फरार खराडेला अटक
खराडे हा फरार होता. शुक्रवारी तो बारामती एमआयडीसीतील पेन्सिल चौकात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला शिताफीने त्याला अटक केली. खुनाचा प्रयत्न, दरोड्यासह अन्य गंभीर गुन्ह्यात मोक्का कारवाईनंतर फरार झालेल्या शुभम ओमप्रकाश खराडे (रा.शेटफळगढे ता. इंदापूर) याला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने बारामती शहरातील पेन्सिल चौकातून शिताफीने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळा दराडे व विजय गोफणे यांना यापूर्वीच नाशिक येथून अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड यांनी केली.
हेही वाचा -धक्कादायक : शिक्रापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार