पुणे - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर एका जखमी वासराला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आणू पालिकेचा निषेध नोंदवला आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मोकाट जनावरांचा, गोवंशाचा प्रश्न मांडण्यात आला. मात्र, यावर कोणी लक्ष दिले नाही म्हणून हा निषेध नोंदवला असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - 'गाव मोठ्ठा विकास छोटा'; कोल्हापूरच्या वाघवे गावची व्यथा
एका वासराला थेट महानगर पालिकेच्या प्रवेश द्वारावर आणून तब्बल अर्धा तास निषेध नोंदवण्यात आला. त्याच्यावर मलपट्टी केली असली तरी ते भेदरलेले होते. डुकरांच्या लसीकरण, त्यांना पकडण्यासाठी पालिका ही शेकडो रुपये मोजत आहे. कुत्रा आणि डुकरांवर मोठ्या प्रमाणावर निधी पालिका उपलब्ध करून देत आहे. मात्र, गोमातेच्या संरक्षणासाठी निधी उपलब्ध होत नाही. असा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे आंदोलक म्हणत होते.
शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोवंश प्रश्नावर चर्चा न झाल्याने . या सर्वांचा निषेध म्हणून पालिकेचा निषेध करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता त्यामुळे जखमी वासरू भेदरलेले होते. यावेळी सुरक्षा रक्षक आणि बजरंग दलाचे कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा या पेक्षा तीव्र आंदोलन करून जनावरे महानगर पालिकेच्या आणली जातील असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
हेही वाचा - मूर्तिजापूर मतदारसंघ: भाजपचे आमदार पिंपळे हॅट्रिकच्या तयारीत; विरोधकांचे कडवे आव्हान