ETV Bharat / state

New Tital To Bacchu Kadu: बच्चू कडू हे 'अपंग हृदयसम्राट'; नवीन उपाधी देत प्रतिमेला दुग्धाभिषेक - प्रहारचे आमदार बच्चू कडू

आपल्या वेगळ्या कार्यशैलीसाठी प्रहारचे आमदार बच्चू कडू ओळखले जातात. या संघटनेकडून अलीकडेच आमदार बच्चू कडू यांना अपंग हृदयसम्राट अशी नवीन उपाधी देण्यात आली आहे. यासह बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक करण्यात आला.

New Tital To Bacchu Kadu
प्रहार कार्यकर्ते
author img

By

Published : Mar 26, 2023, 5:48 PM IST

आमदार बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करताना प्रहारचे कार्यकर्ते

पुणे: नुकतेच काँग्रेसचे नेते माजी खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे खासदारकी पद रद्द करण्यात आले आहे. देशभरात या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या विरोधात जोरदार आंदोलने केली जात आहेत. अश्यातच राज्यात देखील आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने, दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यांची देखील आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

दिव्यांगांसाठी आंदोलन केल्याने शिक्षा? युवक काँग्रेसच्या मागणीच्या विरोधात आज पुण्यातील बालगंधर्व चौकात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आमदार बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक घालण्यात आला. तसेच त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. उत्साही कार्यकर्त्यांकडून आमदार कडू यांना 'अपंग हृदयसम्राट' ही पदवी देण्यात आली. यावर प्रहार संघटनेचे नेते संतोष साठे म्हणाले की, आमचे नेते बच्चू कडू यांनी नाशिक महापालिका येथे दिव्यांग नागरिकांसाठी आंदोलन केले होत म्हणून त्यांच्यावर शिक्षा देण्यात आली आहे. आजवर राज्यात सर्वाधिक गुन्हे दाखल झालेले आमदार हे बच्चू कडू असून राष्ट्रवादी जी मागणी करत आहे त्याला काहीही अर्थ नाही. दिव्यांगांसाठी आंदोलन करणारा आमचा नेता असल्याचे यावेळी साठे यांनी सांगितले आहे. यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

मंत्रिमंडळ विस्तारावर काय म्हणाले आमदार कडू: प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात मोठे विधान जानेवारी, 2023 मध्ये केले होते. शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्यांदाच अपंग मंत्रालयाची निर्मिती केली आहे. अपंगांसाठी अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अपंगांच्या विविध प्रश्नावर काम केले आहे. तसेच त्यांची संघटना ही बांधली आहे. त्यामुळे या मंत्रालयाचा कार्यभार आपसूकच बच्चू कडू यांच्याकडे सोपवला जाणार अशी, अटकळ होती.

अपंग मंत्रालयाला प्रधान सचिव: या संदर्भात बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, अपंग मंत्रालय सरकारने निर्मिती केली आहे. त्यासाठी आता प्रधान सचिव आणि काही पदांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. राज्य सरकार अपंगांच्या बाबतीत नक्कीच काही चांगले निर्णय या मंत्रालयाच्या माध्यमातून येईल अशी आम्ही सर्वजण अपेक्षा करीत आहोत.

हेही वाचा: Ramesh Bais on Disabled Persons : दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको; सहकार्य मिळणे गरजेचे : राज्यपाल रमेश बैस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.