ETV Bharat / state

सह्याद्री पर्वत रांग : नाणेघाटात पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती - bird watching in junnar

राज्यभरात विविध ठिकाणी 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जुन्नरमध्ये वनविभागाच्या सौजन्याने पक्षी निरीक्षण शिबीर भरवण्यात आले आहे.

naneghat wildlife sanctuary
सह्याद्री पर्वत रांग : नाणेघाटात पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती
author img

By

Published : Nov 13, 2020, 4:03 PM IST

पुणे - जुन्नर तालुक्यातील सह्याद्री पर्वत रांगांमधील नाणेघाटात 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह सुरू आहे. महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे, ज्याठिकाणी पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासह जनजागृतीसाठी पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने जुन्नर वनविभागाच्या वतीने पक्ष्यांचे माहेरघर असलेल्या जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या देवराईमध्ये पक्षी निरीक्षण नेचर ट्रेक व पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सह्याद्री पर्वत रांग : नाणेघाटात पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती
निरीक्षणातून पक्ष्यांना ओळख

जुन्नर तालुक्यातील पक्षी, त्यांचा आधिवास, आवाजावरून पक्षी कसे ओळखाल? व पक्षांच्या नोंदी आपण चार भागात कशा प्रकारे करता येतील, तसेच पक्षांचे पर्यावरण व शेतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान याबाबत सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पक्षी अभ्यासक व शेकरू आऊटडोअर संस्थेच्या सदस्यांनीही सहभाग घेतला. यादरम्यान विविध पक्ष्यांची ओळख प्रत्यक्ष निरीक्षणातून पटवून देण्यात आली. पक्षांची माहिती अगदी प्रत्येकाला सहज समजेल व जैवविविधतेच्या संवर्धनासाठी महत्त्वाची माहिती देण्यात आली.

पक्षी निरीक्षण सप्ताहात वनविभाचे योगदान

जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा, वनसंरक्षक अमित भिसे, सहायक वनसंरक्षक संदेश पाटील, व वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी वनपाल- कृष्णा दिघे, मारुती फुलसुंदर,शशिकांत मडके, मनिषा काळे, वनरक्षक - रमेश खरमाळे, वैभव वाजे, सचिन कवठे, नारायण राठोड, त्रिंबक जगताप, मनिषा बनसोडे, वनरक्षक - तेजस्विनी भालेराव, आकाश तंगडवार, स्वरूप रेंगडे, संजय गायकवाड, वनिता वडेकर, निलेश विरणक, दशरथ डोके, विश्वनाथ बेले, रामेश्वर फुलवाड यावेळी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.