पुणे Jai Shriram Auto Rickshaw : येत्या २२ जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. (Rahul Naiku) अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. प्रत्येक जन 'जय श्रीरामचा' नारा देत आहे. आता पासूनच देशभरात तसेच पुणे शहरात देखील राम मंदिराच्या संदर्भात विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. अश्यातच अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका रिक्षाचालकानं चक्क प्रभू श्रीरामांच्या भेटीसाठी रिक्षा तयार केली आहे. हा पुण्यातील रामभक्त थेट रिक्षा घेऊन अयोध्येला जाणार आहे. त्यामुळे आता या रामभक्त रिक्षावाल्याची चर्चा होऊ लागली आहे. (Ayodhya Yatra)
संपूर्ण रिक्षाच राममय केली: राहुल नायकु असं या रामभक्ताचं नाव आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात नायकू हा राहायला आहे. अयोध्या येथे जेव्हा पासून राम मंदिर उभारणीचं काम सुरू आहे तेव्हा पासूनच राहुल हा मंदिराला भेट देण्याचं स्वप्न पाहत होता आणि आता येत्या 22 तारखेला प्रभू श्री राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे, हे एकूण या रामभक्ताने प्रभू श्रीराम यांच्या नावाने रिक्षा बनविली. तो थेट रिक्षा घेऊनच पुण्यातून निघाला आहे. रिक्षावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच्या खालोखाल प्रभू श्रीरामांचं चित्र आणि संपूर्ण रिक्षाला 'जय श्रीराम' या जपानं लिहून या राम भक्तानं संपूर्ण रिक्षाच राममय केली आहे.
4 ते 5 रिक्षाचालक एकत्र अयोध्येला जाणार: याबाबत राहुल म्हणाला की, अयोध्येला जायचं आहे म्हणून मी अशी रिक्षा बनविली आहे. ही रिक्षा बनविण्यासाठी जवळपास 3 महिने लागले आणि याला जवळपास साडेतीन ते चार लाख रुपये एवढा खर्च हा आला आहे. रिक्षाला फ्रंट आणि बॅकला सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे आणि आम्ही 4 ते 5 रिक्षाचालक एकत्र अयोध्येला जाणार आहोत. येत्या 19 तारखेपर्यंत आम्ही तेथे पोहोचू आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन व्हावं ही पहिली इच्छा आहे. मग योगी आदित्यनाथ यांनी या रिक्षात बसावं अशी देखील दुसरी इच्छा असल्याचं यावेळी राहुल यानं सांगितलं.
हेही वाचा: