ETV Bharat / state

Pune Crime : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर हातोडीने हल्ला; आरोपीला अटक - मुलीवर हातोडीने हल्ला पुणे

अल्पवयीन मुलगी कोचिंग क्लासेसवरून घरी येत होती. तेव्हा आरोपी शिवमने अचानक तिच्यावर हल्ला करत डोक्यात हतोड्याने घाव घातले. या गंभीर घटनेत तरुणी जखमी झाली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी आणि पोलीस
आरोपी आणि पोलीस
author img

By

Published : Jan 28, 2022, 6:59 PM IST

पिंपरी चिंचवड - एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर हतोड्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिवम विनोद शेळके नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शिवमने याअगोदर देखील अल्पवयीन मुलीची छेड काढली होती. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते. या प्रकरणी शिवमला अटक करून जेलवारी देखील झाली. मात्र, तो सुधारण्याच काही नाव घेत नव्हता, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले आहे.

माहिती देतांना पोलीस निरीक्षक

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एका तरुणाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर हल्ला करत हतोड्याने घाव घातले आहेत. या घटनेत मुलगी अत्यंत गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अल्पवयीन मुलगी कोचिंग क्लासेसवरून घरी येत होती. तेव्हा आरोपी शिवमने अचानक तिच्यावर हल्ला करत डोक्यात हतोड्याने घाव घातले. या गंभीर घटनेत तरुणी जखमी झाली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा - Nandurbar Accident : बोलेरो आणि दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार तर सात जण जखमी

हेही वाचा - भुलेश्वर येथील ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या 10 आरोपींना अटक; 8 कोटी रुपये जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.