पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी मध्यरात्री वाकड परिसरात अज्ञात दोन चोरांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. अज्ञातांनी गॅस कटरने एटीएम कट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात एटीएम मशीन मधील तब्बल ८ लाख रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. मात्र, हुशार चोरांनी एटीएममध्ये प्रवेश करताच आतील कॅमेऱ्याची दिशा बदलली. यानंतर कटरने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, एटीएम मशीनमधील आठ लाख रुपयांची रक्कम अक्षरशः राख झाली आहे. संबंधित एटीएमएम हे अॅक्सिस बँकेचे आहे. याप्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरांचा शोध घेत आहे.
हेही वाचा - पूर्वीच्या सरकारने पोलीस पाटलांच्या मानधनाबाबत केवळ घोषणाच केली - गृहमंत्री