पूणे - भारतातील एका रत्नापैकी रघुनाथ माशेलकर एक रत्न आहेत, असे मत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा अटल संस्कृती गौरव पूरस्कार या वर्षी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,खासदार गिरीश बापट,महापौर मुरलीधर मोहोळ,सभागृह नेते गणेश बिडकर,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात -
रघुनाथ माशेलकर यांची स्टार्टअप पॉलिसी आल्यानंतर सर्वाधिक स्टार्टअप हे महाराष्ट्रात सुरु झाले असून स्टार्टअपमध्ये सर्वाधिक गुंतवणूकही महाराष्ट्रात झाली आहे. यात सर्वाधिक महत्त्वाच म्हणजे सर्वाधिक स्टार्टअप हे कृषी क्षेत्रात झाली आहेत. यातून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आज शेतकऱ्यांना सर्वाधिक जे लाभ होत आहे ते या स्टार्टअपमुळे होत आहे. असे मत ही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
मराठीत शिकूनही माझे काही नुकसान झाले नाही - डॉ.रघुनाथ मशालकर
लहानपणी माझी आर्थिक परिस्थिती वाईट होती. सातवी उत्तीर्ण झाल्यावर 21 रुपये भरायलाही पैसे नव्हते त्यामुळे मला मोठ्या इंग्रजी शाळेत प्रवेश मिळाला नाही. मी मराठी शाळेत आणि सरकारी शाळेत शिकलो तरीही माझे काही नुकसान झाले नाही, अशी भावना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी यावेळी व्यक्त केली.
दुर्दैवाने आजही मोठी आर्थिक तरतूद विज्ञान आणि तंत्रज्ञानात केली जात नाही -
अटल बिहारी वाजपेयी यांनी वीस वर्षापूर्वी देशाच्या जीडीपीच्या दोन टक्के गुंतवणुक विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करण्याचे घोषित केले होते. मात्र, आजही विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद दुर्दैवाने केली जात नाही. अटल बिहारी वाजपेयी यांनी वीस वर्षापूर्वीची जीडीपीच्या 0.7 टक्के गुंतवणूक दोन टक्के करण्याचे ठरविले होते. मात्र, अद्याप ही मोठ्या प्रमाणावर विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी आर्थिक तरतूद केली जात नाही आहे. शिक्षकांना योग्य प्रतिष्ठा जगामध्ये मिळत नाही, त्यामुळे समाजाला त्यांचे महत्त्व कळत नाही. शिक्षकांना प्रतिष्ठा जर मिळाली नाही तर देश कसा पुढे जाणार आपण शिक्षकांना त्यांची प्रतिष्ठा पुन्हा मिळवून दिली पाहिजे, असेही यावेळी माशेलकर म्हणाले. पुरस्कार वितरण समारंभानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा मै गीत नया गाता हू हा कार्यक्रम सादर झाला