ETV Bharat / state

Market Yard Fire News: पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पुन्हा अग्नी तांडव; दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी

पुण्यातील मार्केटयार्ड येथे काल मध्यराञी एक वाजता मार्केट यार्ड, गेट नंबर एक येथील हॉटेल रेवळ सिद्धि येथे आगीची घटना घडली. या आगीत 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एका कामगारावर उपचार सुरू आहे.

Market Yard Fire News
पुण्यातील मार्केट यार्डमध्ये आगीची घटना
author img

By

Published : Jun 13, 2023, 8:17 AM IST

Updated : Jun 13, 2023, 9:26 AM IST

पुण्यातील मार्केट यार्डमध्ये आगीची घटना

पुणे : पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पुन्हा एकदा भीषण आगीची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. रात्री एकच्या दरम्यान ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली आहे. परंतु पुण्यातील मुख्य भागांमध्ये सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये खूप मोठी आग लागली होती. बरेच दुकानाचे नुकसान झाले होते. परंतु त्यात कुठलीही जीवित हानी झाली नव्हती. रात्रीच्या घटनेत मात्र मोठी जीवित हानी झाली असून, दोन जण मृत्यू पावले आहे. एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश : याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यरात्री एक वाजता मार्केट यार्ड, गेट नंबर एक येथील हॉटेल रेवळ सिद्धि येथे आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. यामधे आतमधे पोटमाळ्यावर झोपलेल्या 3 कामगारांना जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले होते. यातील 2 कामगारांचा मृत्यू तर एकावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पंचनामा करून हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा. आग का लागली याचे कारण अद्याप ही समजलेले नाही, असे यावेळी मार्केटयार्डचे सभापती दिलीप काळभोर यांनी सांगितले.

आगीच्या घटना : पुण्यात प्रामुख्याने ज्या ठिकाणी मोठ्या बाजारपेठ आहेत, त्या मार्केट यार्डमध्ये सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. अरुंद रस्ते त्याचबरोबर उष्णता आणि दुकानदार किंवा सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. प्रामुख्याने अग्निशामक ऑडिट करणे गरजेचे असताना, काही ठिकाणी ऑडिट केलं जात नाही. त्यामुळे सुद्धा अश्या आगीच्या घटना घडत आहेत. वेळीच ऑडिट केले तर अशा घटना टाळता येतील. परंतु त्यातून खबरदारी घेण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण आगीच्या घटना या सातत्याने घडत असून त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Fire Break Out In Chembur : चेंबूरसह भिवंडीतही आगीचे तांडव, स्वस्तिक चेंबरच्या चौथ्या मजल्यावर तर भिवंडीत गोडाऊनला आग
  2. Chemical Company Fire : अंबरनाथ एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट होऊन भीषण आग; आगीत एकाचा मृत्यू, 5 गंभीर
  3. Fire In Buldana : आगीनंतर हे आमदार झाले अग्नीवीर, आग विझवण्यासाठी लावली जीवाची बाजी

Last Updated : Jun 13, 2023, 9:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.