ETV Bharat / state

'कोरोना'शी सामना करण्यासाठी लष्कर सज्ज - लष्करप्रमुख नरवणे - bombay sappers

लष्करी अभियांत्रिकी सेवेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या पुण्यातील खडकी येथील 'बॉम्बे सैर्पस' संस्थेच्या स्थापनेला शनिवारी २०० वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने आयोजित समारोप सोहळ्याला लष्करप्रमुखांनी उपस्थिती लावली होती.

Manoj Narvane
मनोज नरवणे, लष्करप्रमुख
author img

By

Published : Feb 1, 2020, 1:37 PM IST

Updated : Feb 1, 2020, 3:08 PM IST

पुणे - कोरोना विषाणूने चीनमध्ये थैमान घातले आहे. हा विषाणू भारतात पसरू नये, यासाठी लष्कर सज्ज असल्याचे वक्तव्य लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी केले. हा विषाणू रोखण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या रोगाशी सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

'कोरोना'शी सामना करण्यासाठी लष्कर सज्ज - लष्करप्रमुख नरवणे

हेही वाचा - चीनमधून ३२४ भारतीय दिल्लीत दाखल, वैद्यकीय तपासणी सुरू

लष्करी अभियांत्रिकी सेवेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या पुण्यातील खडकी येथील 'बॉम्बे सैर्पस' संस्थेच्या स्थापनेला शनिवारी २०० वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने आयोजित समारोप सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावली होती. लष्करप्रमुखांसह लेफ्टनंट जनरल मायकल मॅथ्यू, लेफ्टनंट जनरल संजीव कुमार श्रीवास्तव, ब्रिगेडिअर एम. जी. कुमार यांनी शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

हेही वाचा - कोरोनाचा कहर : चीनमध्ये २४ तासात आणखी ४६ मृत्यू, बळींची संख्या २५९ वर..

'युद्धाचे बदलते स्वरूप लक्षात घेता यामध्ये अभियंत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. भविष्यातील युद्ध हे अधिक तांत्रिक असणार आहे. त्यामुळे लष्करातील अभियंत्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासह त्याचा वापर करणे आवश्यक आहे. देशाच्या सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची प्रक्रिया निरंतर सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन यावेळी नरवणे यांनी केले.

हेही वाचा - ...म्हणून न्यायाधीश बदलावा, अश्विनी बिद्रे-गोरेंच्या पतीचा साक्ष देण्यास नकार

जवानांचे दिमाखदार संचलन

या कार्यक्रमात जवानांचे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये लष्करी अभियांत्रिकी तुकडीचे जवान, शीख आणि मराठा लाईट इन्फंट्रीच्या ६ तुकड्या सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी पथसंचलनाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी संचलनाची पाहणी केली. यावेळी लष्करी जवानांनी दिमाखदार संचलन करत उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी सुखोई-३० या लढाऊ विमानाने सलामी देत प्रात्यक्षिके सादर केले.

Intro:काेराेना व्हायरस देशात पसरु नये यासाठी लष्कर सज्ज - लष्करप्रमुख मनोज नरवणे

कोरोना व्हायरसचा शिरकाव आपल्या देशात होऊ नये यासाठी सर्व देश प्रयत्नात आहेत. चीनच्या वूहान शहरात अडकलेल्या तीनशे भारतीयांना आणण्यासाठी विशेष विमानाने उड्डाणही केले आहे. या प्रवाशांवर लष्कराच्या वैद्यकीय पथकामार्फत उपचार केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी काेराेना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचे सांगितले. या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशातील सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हा आजार देशात पसरू नये यासाठी लष्करातर्फे आवश्यक त्या उपाययाेजना केल्या जात असल्याचे त्यांनी शनिवारी पत्रकारांशी बाेलताना सांगितले.

लष्करी अभियांत्रिकी सेवेत महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या पुण्यातील खडकी येथील बॉम्बे सैर्पस संस्थेच्या स्थापनेला 200 वर्ष पूर्ण हाेत असल्याचे निमित्ताने आयाेजित कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्याला ते पुण्यात आले हाेते. यावेळी लष्करप्रमुख नरवणे, लेफ्टनंट जनरल मायकल मॅथ्यू, लेफ्टनंट जनरल संजीवकुमार श्रीवास्तव, ब्रिगेडिअर एम.जी.कुमार यांनी शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.

नरवणे म्हणाले, ययुद्धाचे बदलते स्वरूप लक्षात घेता यामध्ये अभियंत्यांची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे. भविष्यातील युध्द हे अधिक तांत्रिक असणार आहे. त्यामुळे लष्करातील अभियंत्यानी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि त्याचा वापर लष्करासाठी करणे आवश्यक याहे. देशाच्या सीमावर्ती भागात पपायाभूत सुविधा निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि ही प्रक्रिया निरंतन राहणारी आहे.

जवानांचे दिमाखदार संचलन

बाॅम्बे स्पैर्सला 200 वर्ष झाल्याचे निमित्ताने लष्करी अभियांत्रिकी तुकडीचे जवान, सिख लाट इन्फंट्री आणि मराठा लाईट इन्फंट्रीच्या सहा तुकडया सहभागी झाले हाेत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लष्करप्रमुख जनरल मनाेज नरवणे यांनी पथसंचलनाची मानवंदना स्विकारली त्यानंतर त्यांनी संचलनाची पाहणी केली. यावेळी लष्करी जवानांनी दिमाखदार संचलन करत उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी सुखोई-30 या लढाऊ विमानाने सलामी देत मानवंदना दिली. Body:।।Conclusion:।।
Last Updated : Feb 1, 2020, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.