ETV Bharat / state

भीमाशंकर परिसरात गावकरी व मुंबईकर यांच्यात सशस्त्र हाणामारी, 8 जण गंभीर - दोन गटात हाणामारी

मुंबईचे नागरिक कोरोनाच्या भीतीने आपाआपल्या गावी परतत आहेत. या नागरिकांकडून प्रशासनाच्या नियमांचे पालन होत नसल्याने गावा-गावात मुंबईकर व ग्रामीण असे वाद होताना दिसत आहेत. भीमाशंकर परिसरातील मंदोशी व वाळद गावात दोन गटांमध्ये सशस्त्र हल्ला झाला.

clash between villagers and Mumbai Citizen
भीमाशंकर परिसरात गावकरी व मुंबईकर यांच्यात सशस्त्र हाणामारी
author img

By

Published : May 24, 2020, 3:55 PM IST

पुणे - कोरोनाचा संसर्ग पुणे-मुंबई परिसरात वाढत असताना तेथील नागरिक गावाला येऊ. त्यामुळे गावकरी आणि मुंबईकर यांच्यातील संघर्ष सुरु झाला आहे. भीमाशंकर परिसरातील मंदोशी व वाळद गावात दोन गटांमध्ये धारदार हत्यांराच्या सहाय्याने एकमेकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीस निरिक्षक अरविंद चौधरींचे सहकार्याचे आवाहन
भीमाशंकर परिसरातील 20 गावांमध्ये मुंबई परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक आले आहेत. या नागरिकांना प्रशासनाकडून क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र नागरिकांकडून क्वारंटाईनच्या कुठल्याच नियमांचे पालन केले जात नाही. उलट गावकऱ्यांवर जीवघेण्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे परिसरात गावकरी व मुंबईकर असा वाद निर्माण होत असताना नागरिकांनी कोरोनाच्या संकट काळात प्रशासनाला सहकार्य करुन क्वारंटाईनच्या नियमांचे पालन करुन कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन, पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी यांनी केले आहे.कोरोनाच्या संकट काळात प्रत्येकाने एकत्र येऊन या महामारीवर मात करण्यासाठी लढण्याची गरज असताना माणसेच माणसांच्या जीवावर आल्याने माणसातील माणुसकी हरवली असल्याचे चित्र दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.