ETV Bharat / state

Pune Airport : पुणे विमानतळावरून आत्ता 200 पेक्षा जास्त उड्डाणे, विमानतळ प्रशासनाच्या प्रस्तावाला मंजुरी..

author img

By

Published : Oct 30, 2022, 6:09 PM IST

हवाई वाहतूक क्षेत्रातून महत्वाची माहिती समोर आली आहे. पुणे विमानतळावरून आता दररोज 200 पेक्षा अधिक उड्डाणे होणार ( More than 200 flights from Pune Airport ) आहेत. पुणे विमानतळावरून उड्डाणे वाढविण्याच्या विमानतळ प्रशासनाच्या प्रस्तावाला भारतीय हवाई दलाने ( Indian Air Force ) नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरील गर्दी कमी होणार असून, प्रवाशांना तत्काळ विमाने उपलब्ध होणार आहेत.

Pune Airport
Etv Bharat

पुणे : हवाई वाहतूक क्षेत्रातून महत्वाची माहिती समोर आली आहे. पुणे विमानतळावरून आता दररोज 200 पेक्षा अधिक उड्डाणे होणार ( More than 200 flights from Pune Airport ) आहेत. पुणे विमानतळावरून उड्डाणे वाढविण्याच्या विमानतळ प्रशासनाच्या प्रस्तावाला भारतीय हवाई दलाने ( Indian Air Force ) नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरील गर्दी कमी होणार असून, प्रवाशांना तत्काळ विमाने उपलब्ध होणार आहेत.

Pune Airport
पुणे विमानतळावरून आत्ता 200 पेक्षा जास्त उड्डाणांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

असे असेल विमान वाहतूक - पुणे विमानतळावर सध्या रोज सरासरी १६० ते १७० विमानांची ये-जा होते. विंटर शेड्यूलमध्ये सोमवार ते शुक्रवार दरम्यान १०९ स्लॉट म्हणजेच २१८ विमानांना ये-जा करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात २०० विमानांची वाहतूक होणार आहे. तसेच शनिवारी २२० विमानांना वाहतुकीस परवानगी देण्यात आली.रविवारी २४९ विमानांच्या वाहतुकीस परवानगी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात २०३ विमानांची वाहतूक होईल.

विमान उड्डाणात वाढ - सध्या पुणे विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत नियमित विमान उड्डाणे वाढविण्यास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव विमानतळ प्रशासनाने भारतीय हवाई दलाला ( Airport Authority proposal to IAF ) दिला होता. त्याला नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यानुसार 30 ऑक्टोबर 2022 पासून येथील उड्डाणांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.पुणे विमानतळावरून आत्ता दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, गोवा,तसेच इतर ठिकाणी आणखी उड्डाणे वाढविण्यात येणार आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.