पुणे - शहरात सध्या एका केळीवाल्याची ( Keliwala from Pune ) चर्चा सुरू आहे. हटके डान्स करून आणि हातात, डोक्यावर केळी घेऊन हा केळीवाला ग्राहकांना आकर्षित करतो आहे. ( Bana Selling by doing Dance ) नामदेव दत्ता माने असे या केळीवाल्याचे नाव असून त्यांचा केळीचा व्यवसाय चर्चेचा विषय ठरतो आहे. नामदेव यांना कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपली नोकरी गमवावी लागली. त्यामुळे व्यवसाय करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळेच त्यांनी फळविक्रीचा व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यात त्यांना यश आले असून ग्राहकांनी देखील त्यांना पसंती दिली आहे. ( Banana Seller Namdev Mane )
मी व्यवसायात सुखी -
नामदेव दत्ता माने यांची तीन वर्षांपूर्वी कोरोनामुळे नोकरी गेली. घरातील कुटुंब त्यांच्यावर विसंबून होतं. दुसरा आर्थिक स्रोत नसल्याने त्यांनी केळी विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. अगोदर, काही प्रमाणात केळी विकण्यास सुरुवात केली. त्यात त्यांना जेमतेमच पैसे मिळत होते. त्यामुळं त्यांनी पुण्यातील दिघी, आळंदी-पुणे रोडवर केळी विकण्यास सुरू केले. मात्र, केळीची विक्री करायची कशी असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यांनी सहज हातात, डोक्यावर केळीची फनी घेऊन आणि दराची पाटी गळ्यात अडकवून डान्स करत केळी घेण्याचं आवाहन ते रस्त्यावरून जणाऱ्या ग्राहकांना करत. ते कमी वेळेत ग्राहकांच लक्ष वेधण्यात यशस्वी झाले. नामदेव यांचा व्यवसाय जोमात सुरू आहे. मात्र, त्यांना नोकरी गमावल्याची खंतदेखील आहे. नामदेव यांना महिन्याकाठी 15 हजार रुपये मिळायचे, असे नामदेव यांनी सांगितले. तर, व्यवसायात चढ उतार पाहायला मिळतो. मात्र, मी यात सुखी असल्याचं नामदेव सांगतात.
हेही वाचा - Sunil Mehta Passes Away : मेहता पब्लिशिंग कंपनीचे संचालक सुनील मेहता यांचे निधन
दरम्यान, तीन वर्षांपासून कोरोना महामारी जगभर धुमाकूळ घालत आहे. त्यामुळं हजारो-लाखो नागरिकांना नोकरी गमवावी लागली आहे. अनेकांनी हताश होऊन आत्महत्या करत जीवन संपवले आहे. मात्र, नामदेव यांनी दाखवलेले कर्तव्य खरच कौतुकास्पद आहे.