ETV Bharat / state

पुणे बाजार समिती पुन्हा एकदा गजबजली, शेतमालाची २०० वाहने दाखल

author img

By

Published : May 31, 2020, 11:08 AM IST

Updated : May 31, 2020, 12:22 PM IST

शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्राहकांना वाजवी दरात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी आडते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन यांच्यात झालेल्या बैठक झाली. त्यानंतर बाजार समितीने मार्केटयार्डमधील व्यवहार परत सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार काही अटींसह बाजार समिती सुरु झाली आहे.

edited photo
संपादीत छायाचित्र

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीदरम्यान बंद असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार आजपासून सुरू झाले आहेत. शनिवारी (दि.30 मे) रात्रीपासून भाजीपाला, फळांच्या गाड्या येण्यास सुरुवात झाली असून आज (दि. 31 मे) पहाटेपासून या बाजाराला सुरुवात झाली. असून सुमारे 200 वाहनांमधून 11 हजार क्विंटल शेतमालाची आवक झाली आहे.

खरेदी-विक्री दरम्यान येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध नियम व अटी घालून देण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावर येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान थर्मलगनद्वारे नोंदवले जात आहे. सामाजिक अंतराचे नियम पाळण्यासाठी 50 टक्के आडते एका दिवशी तर 50 टक्के आडते दुसऱ्या दिवशी याप्रमाणे काम करतील. त्यानुसार आज सकाळपासून हा बाजार गजबजलेला पाहण्यास मिळाला. या बाजारात सकाळपासून 200 गाड्यांमधून 11 हजार क्विंटल इतक्या शेतमालाची आवक झाली आहे.

बाजार समितीतील दृश्य
पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून संपूर्ण पुणे शहराला येथून भाजीपाला पुरवला जातो. याशिवाय उपबाजार असलेले मोशी, मांजरी, उत्तमनगर येथील बाजारही सुरू झाले आहेत. मार्केटयार्डात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर दिले जात आहे. मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. भाजीपाला आणि फळांचा बाजार असलेले हे मार्केटयार्ड लॉकडाऊनमुळे मागील महिनाभरापासून बंद होते. या मार्केटयार्डमध्ये काम करणारे बहुतांश कामगार रेड झोन परिसरात राहणारे असल्यामुळे बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्राहकांना वाजवी दरात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी आडते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर बाजार समितीने मार्केटयार्डमधील व्यवहार परत सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा - अखेर पुणे विभागातून 2 लाख 4 हजार परप्रांतीय रेल्वेने रवाना

Last Updated : May 31, 2020, 12:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.