पुणे - अमेरिकेची सुनबाई असलेल्या अपर्णा देशमुख याखास मतदानासाठी अमेरिकेहून सोमवारी पिंपरी-चिंचवड मध्ये दाखल झाल्या आणि मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात असणाऱ्या नूतन महाविद्यालयात येऊन शिरूर मतदार संघासाठी मतदान केले. मतदानाच्या वेळी अनेक तरुण-तरुणी हे मतदान न करता सुट्टीचा आनंद घेत सहली काढतात, त्यामुळे ते मतदानापासून वंचित राहतात. मात्र तरुणांनी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन अपर्णा यांनी केले आहे.
अपर्णा देशमुख या मूळ च्या पिंपरी-चिंचवडच्या असून त्यांचा विवाह अमेरिकेत (कोलंबस) येथे कार्यकरत असलेल्या धनाजी देशमुख यांच्याशी मे महिन्यात झाला होता. धनाजी हे कमिन्स नावाच्या कंपनीत उच्च पदावर आहेत. अपर्णा यांचे मतदान हे पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे असून ते शिरूर मतदारसंघात येते. सातासमुद्रापार २४ तासांचा प्रवास करत अपर्णा रात्री उशिरा पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आज चिखलीत मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
अपर्णा म्हणाल्या, वर्षभर सुट्ट्या खूप येतात, मात्र मतदानाच्या दिवशी फिरायला न जाता युवा पिढीने मतदान केले पाहिजे. देशासाठी युवा नेतृत्व महत्वाचे असल्याचे देखील अपर्णा म्हणाल्या. यावेळी त्याच्यासोबत त्यांनी बहीण अर्चना बाबर, वडील दिलीप देशमुख, आई सुरेखा देशमुख आणि भाऊ अविनाश बांदल यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.