पुणे: म्हाडा भरती परीक्षापेपरफुटी प्रकरणाचा (MHADA exam paper leak case) पर्दाफाश पुणे सायबर पाेलीसांनी (Pune Cyber Police) केला. जी.ए.साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी प्रा.लि. कंपनीचा संचालक डाॅ.प्रितिश देशमुख याच्यासह अंकुश हरकळ, संतोष हरकळ या एजंट बंधूंना अटक केली. याप्रकरणात पाेलीसांनी बीड मधील एजंट जीवन सानप याला उमेदवार मिळवून देण्याचे काम करणाऱ्या एजंट काचंन श्रीमंत साळवे (३१) रा.नागसेन नगर, धानाेरा राेड,बीड याला अटक केली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आली असून कांचन साळवे हा अकरावा आरोपी आहे. साळवेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जी. ए. सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतिश देशमुख याने म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी जवळपास १० एजंटांशी संपर्क केला होता. या एजंटांनी परीक्षार्थीशी संपर्क साधून त्यांना पेपर कोरा सोडण्यास सांगण्यात येणार होते. त्यानंतर ओएमआरशीटमध्ये देशमुख फेरफार करून परीक्षार्थींना पास करणार होता. हा त्यांचा बदललेला प्लॅन होता. ४ पेन ड्राईव्ह, टॅब, मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात कांचन साळवी हा 11 वा आरोपी आहे.