पुणे - वारजे माळवाडी परिसरातील गोकुळनगरमध्ये एकाचवेळी 30 ते 35 जनावरे मृतावस्थेत आढळली. निलगिरी कॉलनी, दत्तनगर परिसरात 7 श्वान, 30 डुकरे आणि 1 मांजराचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - 'त्या' विद्यार्थिनीचा मृत्यू शिक्षकामुळेच, परीक्षा चुकवण्यासाठी सुचवला 'भयंकर उपाय'..
स्थानिक नागरिकांनी या बाबात पोलिसांना माहिती दिल्यानंतर वारजे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मृत जनावरे सापडलेल्या ठिकाणी काही पिठाचे गोळे आढळले. यातूनच या प्राण्यांना विषबाधा झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.