पुणे - काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा खळबळजनक दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला असल्याची बातमी आज एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. यावर खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अनिल देखमुख पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी, काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, या बातमीविषयी स्पष्टीकरण दिले. 'असे मी म्हणालोच नाही. माझ्या तोंडी हे वाक्य टाकले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल,' असे सांगत त्यांनी कानावर हात ठेवले.
वर्तमानपत्रात जी बातमी माझे वक्तव्य म्हणून छापण्यात आली ती निराधार आहे. माझ्या तोंडात तसे वक्तव्य टाकण्यात आले आहे. असे मी कुठेही बोललो नाही. आपण क्लिपिंग पहिल्या तर, वस्तुस्थिती समोर येईल, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
सरकार पडण्याचा पोलीस खात्यातर्फे जोरदार प्रयत्न झाल्याचे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुलाखतीमध्ये सांगितले असल्याचे, वृत्त एका वृत्तपत्राने छापले आहे.
हेही वाचा - पिंपरी चिंचवडमध्ये मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची महिला पोलिसाला शिवीगाळ
हेही वाचा - लवकरच होणार 'कोविशिल्ड'ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी; ससून रुग्णालयात नावनोंदणी सुरू