पुणे - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी करण्यात आला. वर्षातील पहिली अंगारकी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत ट्रस्टने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
इतिहासात पहिल्यांदाच अंगारकी चतुर्थीला 'दगडूशेठ' गणपती मंदिर बंद
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे.
कोरोना इफेक्ट : इतिहासात पहिल्यांदाच अंगारकी चतुर्थीला 'दगडूशेठ' गणपती मंदिर दर्शनासाठी बंद
पुणे - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी करण्यात आला. वर्षातील पहिली अंगारकी असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत ट्रस्टने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अंगारकी चतुर्थीला शहर व उपनगरातून दरवर्षी सुमारे ३ ते ४ लाख भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणत गर्दी होते. यासाठी खबरदारी म्हणून आज मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. आज भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात नाहीये. भाविक रस्त्यावरून बाप्पाचे दर्शन घेत ट्रस्ट चालकांच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत.
भक्तांसाठी ऑनलाईन सुविधा
अंगारकीच्या दिवसासह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर या माध्यमांद्वारे २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.
मंदिरात खबरदारी म्हणून सर्व सुविधा हार, नारळ स्वीकारणे बंद
पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये भाविकांकडून प्रसाद, फुले, हार स्वीकारणे बंद केले आहे. राज्य सरकारने जी नियमावली आखून दिली आहे. त्याचे काटेकोरपणे पालन मंदिरात केले जात आहे.

Last Updated : Mar 2, 2021, 12:25 PM IST