पुणे : अमृता फडणवीस ( Amrita Fadnavis ) यांनी पुण्यात विविध विषयांवर संवाद साधला. नुकतेच त्यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याच्या लॉंच दरम्यान अमृता फडणवीस यांनी उर्फी जावेद प्रकरणावर भाष्य केले आहे.( Clashes in Chitra Wagh and Urfi Javed ) सोशल मीडियावर ट्रोलबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की आत्ता ट्रोल होण्याची मला सवय झाली आहे. मी आत्ता देवाचे भजन जरी केले तरी ट्रोल होते. ( Habit of facing trolling )
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादावर अमृता फडणवीसांची भूमिका : सध्या सुरू असलेल्या उर्फी जावेद आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वादावर अमृता फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाल्या की चित्रा वाघ यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे. ( clashes in Chitra Wagh and Urfi Javed ) की काहींची व्यावसायिक गरज असते, त्यांना त्याप्रकारचे सीन करावे लागतात. पण तुम्ही केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी रस्त्यावर तसे फिरत असाल, तर ते ठीक नाही. चित्रा वाघ यांचे जे विचार होते, ते त्यांनी प्रकट केले आहेत. त्यानुसार त्या कारवाई करत आहेत. माझा विचार असा आहे की, उर्फीने जिथे फ्रोफेशनली कमेंटमेंट नाही. तिथे संस्कृतीच्या हिशोबाने राहिले तर चांगले आहे. बाकी मला वैयक्तिक सांगायचे झाले तर उर्फीही एक स्त्री आहे, ती जे काही करते आहे. ते ती स्वत:साठीच करत आहे. त्यामध्ये मला काहीही वावगे वाटत नाही, असे यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या.
नवीन गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच नुकतेच 'आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे' हे गाणे रिलीज झाले आहे. ( Amruta fadanvis new song release ) या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. यावर विचारले असता ते म्हणाले की या गाण्याला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. तर काही जण ट्रोल देखील करत आहेत. अमृता फडणवीस म्हणाल्या की, मला खूप आनंद होत आहे. लोकांना गाणे आवडले, स्वीकारले त्याचे रिल्स होत आहेत. माझा विश्वास आहे. कोणीही काही बोलले तरी काम करत राहिन.
सरकारच्या कामकाजाबाबत अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या की मला तर सरकारच काम खूपच चांगल वाटत आहे. मला म्हणान्यापेक्षा सरकार मधील लोकांना माहीत आहे की काय केले पाहिजे काय नाही केल पाहिजे. तसेच किती लोक कमी आहे आणि महिलांबाबत लवकरच ते विस्तार देखील करतील असे देखील यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या.