पुणे - राज्यात सरकार स्थापन करण्यावरुन भाजप आणि शिवसेनेत संघर्ष निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 200 टक्के काम केले आहे. त्यांच्याएवढे काम न भूतो न भविष्यत: कोण करु शकते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत राज्याचं नेतृत्व करण्यासाठी भाजपच सक्षम आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. पुण्यात फडणवीस एका खासगी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होत्या.
हेही वाचा - राम मंदिर-बाबरी मस्जिद निकालाप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस सतर्क
त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या इतके महाराष्ट्राला कोणी न्याय देऊ शकत नाही. हे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि जनता ओळखून आहे. त्यामुळे सर्वात जास्त जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या आहेत. त्या दृष्टीनेच पुढील वाटचाल सुरू होईल याची मला खात्री असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड
मी सेनेला अपील करण्यायोग्य व्यक्ती नाही आणि माझं ऐकणार नाहीत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत राज्याचं नेतृत्व करण्यासाठी भाजपच सक्षम असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले.