ETV Bharat / state

पुणे पोलिसांना मोठे यश, कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यातील 5 कोटी 73 लाख आणले परत - Pune latest news

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर कॉसमॉस बँकेचे मुख्यालय आहे. ऑगस्ट 2018 मध्ये सायबर चोरट्यांनी याच मुख्यालयातील बँकेच्या एटीएम स्वीचवर (सर्व्हर) मालवेअर हल्ला चढवला होता. त्याद्वारे त्यांनी 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम लुटली होती.

Cosmos Bank
कॉसमॉस बँक
author img

By

Published : Feb 17, 2020, 11:32 PM IST

पुणे - कॉसमॉस बँकेवर ऑगस्ट 2018 मध्ये झालेल्या सायबर हल्ला प्रकरणात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या सायबर हल्ल्यात चोरट्यांनी कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीचवर (सर्व्हर) हल्ला चढवत तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये लंपास केले होते. यातील 5 कोटी 73 लाख रुपये परत मिळविण्यात पुण्याचा सायबर पोलिसांना यश आले आहे. अशा प्रकारे सायबर हल्ल्यात चोरीला गेलेली रक्कम परदेशातुन परत मिळवण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर कॉसमॉस बँकेचे मुख्यालय आहे. ऑगस्ट 2018 मध्ये सायबर चोरट्यांनी याच मुख्यालयातील बँकेच्या एटीएम स्वीचवर (सर्व्हर) मालवेअर हल्ला चढवला होता. त्याद्वारे त्यांनी 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम लुटली होती. तब्बल 26 देशांतील बँकांच्या एटीएममधून हे पैसे काढण्यात आले होते. तर हाँगकाँगमधील हेनसेंग बँकेत 13 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्यात आली होती. या घटनेमुळे तेव्हा संपूर्ण भारतात एकच खळबळ माजली होती.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये इंदोरीकरांची बैलगाडीमधून मिरवणूक; नागरिकांनी दर्शवला पाठिंबा

या गुन्ह्याच्या तपासासाठी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडून विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली होते. या पथकामध्ये सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व सायबर तज्ज्ञांचा समावेश होता. या घटनेनंतर सायबर पोलिसांनी कोल्हापूर, मुंबई, पुणे व इंदौर या शहरातील एटीएममधून पैसे काढणाऱ्यांना अटक केली होती.

एकीकडे आरोपींना अटक करत असतानाच दुसरीकडे बँकांमध्ये असलेली कोट्यावधी रुपयांची रक्कम आणण्यासाठीही पोलिसांकडून पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार हाँगकाँगमधील हेनसेंग बॅंकेमध्ये ए.एल.एम ट्रेडिंग लिमिटेड या खात्यावर 13 कोटी 92 लाख रुपये वर्ग करण्यात आले होते. रक्कम परत मिळावी, यासाठी सायबर पोलिसांनी हाँगकाँगच्या हेनसेंग बँक, न्यायालय व तेथील सरकारशी तत्काळ पत्रव्यवहार केला.

त्यानंतर पोलिसांनी 10 कोटी रुपये गोठवले होते होते. ही रक्कम परत मिळावी, यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरु होते. दरम्यान, हाँगकाँगमधील न्यायालयात सोमवारी सकाळी ही प्रक्रिया पार पडली. त्यानंतर कॉसमॉस बँकेच्या खात्यात 5 कोटी 73 लाख रुपये पैसे जमा झाले आहेत.

हेही वाचा - 'ते तोडायचे काम करतील, आम्ही जोडायचे काम करु'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.