ETV Bharat / state

Amit Shah To Visit Pune : अमित शाह पुण्यात येणार, गिरीश बापट यांची भेट घेण्यासह अनेक कार्यक्रम नियोजित

author img

By

Published : Feb 18, 2023, 12:29 PM IST

केंद्रीय मंत्री अमित शाह हे येत्या आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. शाह यांच्या पुणे दौऱ्याची शहर भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शाह यांच्या हस्ते पुण्यातील आंबेगाव येथील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उभारलेल्या शिवसृष्टीचे लोकार्पण होणार आहे. याशिवाय 'मोदी ॲट ट्वेन्टी' या पुस्तकाचे प्रकाशन शाह यांच्या हस्ते होणार आहे.

Amit Shah To Visit Pune
अमित शाह

पुणे : मोदी ॲट ट्वेन्टी या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम डिपी रोडवर पंडित फार्म येथे आयोजित करण्यात आला आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

अमित शाहा हे आज पुणे दौवऱ्यावर : केंद्रीय मंत्री अमित शाहा हे आज दुपारी पुण्यात येणार आहेत. त्यानंतर ते सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर काश्मीरमध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलींसोबत संवाद कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर शाह हे ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन घेणार आहेत. मग खासदार गिरीश बापट यांची देखील ते भेट घेणार आहेत. त्यानंतर शाह यांचा पुण्यात मुक्काम आहे. १९ फेब्रुवारीला सकाळी शिवसृष्टीचे लोकार्पण झाल्यानंतर अमित शाह कोल्हापूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कोल्हापूर अमित शाह यांची सासुरवाडी असून दोन दिवस विविध सार्वजनिक कार्यक्रम होणार आहेत.

कसबा पोट निवडणुकीच्या प्रचार : कसबा पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह हे पुण्यात येत आहे.अस सांगितल जात आहे.महाशिवरात्र निमित्ताने शाह हे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर येथे भेट देऊन आरती देखील करणार आहे तसेच गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे खासदार गिरीश बापट हे आजारी असून विविध नेते मंडळी हे त्यांची भेट घेत आहे.केंद्रीय मंत्री अमित शाह हे आज पुणे दौऱ्यावर असल्याने ते आज बापट यांची देखील भेट घेणार आहे .

असा आहे गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा :

  1. दुपारी २.३५ वाजता, पुणे विमानतळ तेथून २.५० वाजता सिंहगड कॉलेज चे हेलिपॅड या ठिकाणी आगमन
  2. दुपारी ३ वाजता - सहकार परिषद, दैनिक सकाळ, हॉटेल टीप टॉप, वाकड येथे आयोजित करण्यात आली आहे.
  3. संध्याकाळी ५ वाजता - काश्मीर मध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलींसोबत संवाद साधणार आहेत. जे डब्ल्यू मेरीयेट, एस बी रोड
  4. संध्याकाळी ७. ४५ वाजता - मोदी @२० पुस्तक प्रकाशन, पंडित फॉर्म्स, डी पी रोड
  5. रात्री ९ वाजता - ओंकारेश्वर मंदिर दर्शन घेणार आहेत.
  6. रात्री ९.२५ वाजता - खासदार गिरीश बापट यांची त्यांच्या निवस्थानी भेट
  7. सकाळी ११ वाजता - शिवसृष्टी लोकार्पण सोहळा, आंबेगाव, पुणे उपस्थिती लावणार आहेत
  8. दुपारी १.३० वाजता - पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना

हेही वाचा : Thackeray Group Meeting : उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदार, खासदारांची बैठक! ठाकरे गटात अस्वस्थता कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.