ETV Bharat / state

Madandas Devi Funeral: अमित शाह, मोहन भागवत यांच्यासह मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मदनदास देवी यांचे घेतले अंत्यदर्शन

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी सह-सरकार्यवाह मदनदास देवी यांचे सोमवारी निधन झाले. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आहे.

author img

By

Published : Jul 25, 2023, 12:30 PM IST

Tribute offering
मदनदास देवी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतले अंत्यदर्शन

पुणे : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी (वय 81 वर्षे) यांचे सोमवार (24 जुलै) रोजी पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. सकाळी ९ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत पार्थिव मोतीबागेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

'स्वयंसेवक ते सहसरकार्यवाह' असा प्रवास : मदनदास देवी यांचा जन्म 9 जुलै रोजी झाला होता. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे त्यांचे मूळ गाव आहे. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात मदनदास देवी यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले होते. एम. कॉम पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयएलएस लॉ कॉलेजमध्ये सुवर्णपदकासह एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण केली. राष्ट्रीय स्तरावर रँक मिळवत त्यांनी सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण केली होती. शिक्षण घेत असतानाच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. तेव्हापासून त्यांनी आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघ कार्यासाठी वाहून घेतले होते. आयुष्यातील जवळपास 70 वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. दैनंदिन शाखेतील स्वयंसेवकापासून सह सरकार्यवाह असा त्यांचा प्रवास झाला.

अंत्यदर्शनासाठी गर्दी : अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची आणि अजित पवार यांची भेट झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचार प्रमुख मदनदास देवी यांच्या निधन झाल्यानंतर पुण्यातील मोतीबाग कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे. थोड्याच वेळात गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सुद्धा त्यांचे अंत्यदर्शन घेणार आहेत. सकाळपासूनच मोतीबाग भागामध्ये संघाच्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या चाहत्यांची गर्दी झालेली आहे. नऊ वाजल्यापासून त्यांच्या अंत्यदर्शनाला सुरुवात झालेली आहे.

हेही वाचा :

  1. Amit Shah News:आरएसएसचे सह सरकार्यवाह मदन दास देवी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, अमित शाह राहणार उपस्थित
  2. Madan Das Devi passed away : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मदनदास देवी यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.