मुंबई PM Kisan Yojana 18th installment : पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचं शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तातंरण करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वाशिम येथे आयोजित कार्यक्रमात 20 हजार कोटींहून अधिक निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित केला.
18 वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा : यावेळी पंतप्रधानांनी 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये एकाच वेळी हस्तांतरित केले आहेत. पीएम मोदी किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. देशभरातील शेतकरी PM किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची आतुरतेनं वाट पाहत होते. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 3 हप्ते दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतात. या योजनेअंतर्गत, एकूण 6000 रुपये सरकारकडून थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातात. PM Kisan चा 17 वा हप्ता 18 जून 2024 रोजी हस्तांतरित करण्यात आला होता. हा हप्ता स्वतः PM नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीच्या कार्यक्रमात जारी केला होता. आता दिवाळीपूर्वी 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.
माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी ने आज वाशिम, महाराष्ट्र में आयोजित किसान सम्मान सम्मेलन के दौरान पीएम किसान योजना की 18वीं किस्त के अंतर्गत 9.4 करोड़ से अधिक किसानों को ₹20 हजार करोड़ से अधिक की धनराशि का हस्तांतरण किया। इस महत्वपूर्ण पहल का उद्देश्य किसानों को आर्थिक रूप… pic.twitter.com/MwFUHhyHHt
— Agriculture INDIA (@AgriGoI) October 5, 2024
कधी सुरू झाली योजना : PM किसान योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू आहे. या योजनेच्या निकषानुसार, प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 6000 रुपये बँक खात्यात जमा केले जातात. योजनेअंतर्गत, सप्टेंबर 2024 अखेर सुमारे महाराष्ट्रातील 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये एकूण 17 हप्त्यांमध्ये 32 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
हे वाचलंत का :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार उद्घाटन, 'असा' असेल संपूर्ण दौरा - PM Modi Maharashtra Visit
- राहुल गांधी यांचा भाजपावर हल्लाबोल; शिवरायांचा पुतळा पडण्याचं सांगितलं कारण - Rahul Gandhi Reach At Kolhapur
- "जिथे जातात तेथे पक्षाचा नाश करतात...", विनायक राऊत यांची राणेंवर टीका - Vinayak Raut On Rane