ETV Bharat / state

सुमारे 100 देशातील राजदूत देणार सीरम इन्स्टिट्यूटला भेट; लसीबाबत घेणार माहिती - 100 देशातील राजदूत देणार सिरम इन्सिटटयूटला भेट

'काेविशिल्ड' या लसीचे उत्पादन सीरममध्ये हाेऊन ते जगभरात वितरित केले जाणार आहे. पंतप्रधान माेदी यांच्यासह दिल्लीतील सुमारे 100 देशांचे राजदूत सीरमला 4 आणि 5 डिसेंबर राेजी भेट देऊन यासंर्दभातील माहिती घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.

ambassadors-from-around-100-countries-will-visit-the-serum-institute-in-pune
सुमारे 100 देशातील राजदूत देणार सिरम इन्सिटटयूटला भेट; लसीबाबत घेणार माहिती
author img

By

Published : Nov 24, 2020, 8:26 PM IST

पुणे - ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‌ॅस्ट्राझेन्का कंपनीसाेबत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लस निर्मितीचा करार केलेला असून ‘काेवीशिल्ड’ ही लस निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. याबाबतची माहिती जाणून घेण्याकरिता पतंप्रधान नरेंद्र माेदी 28 नाेव्हेंबर राेजी सिरमला भेट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच दिल्लीतील सुमारे 100 देशांचे राजदूत 4 आणि 5 डिसेंबर राेजी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन यासंर्दभातील माहिती घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची प्रतिक्रिया

असा असेल राजदुतांचा पुणे दौरा-

सुरुवातीला या राजदूतांचे शिष्टमंडळ 27 नाेव्हेंबर राेजी सीरमला भेट देणार हाेते; परंतु त्यात बदल करून हा दाैरा 4 व 5 डिसेंबर राेजी आयोजित आला आहे. चार डिसेंबर राेजी दिल्लीतून विशेष विमानाने या राजदूतांचे एक शिष्टमंडळ पुण्यातील विमानतळावर आगमन करतील. त्यानंतर हडपसर परिसरातील सीरम संस्थेला ते भेट देणार आहे. त्यानंतर हिंजवडीमधील लस निर्मितीशी संबंधित जिनाेव्हा बायाेफार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीलासुद्धा ते भेट देणार आहेत. त्यानंतर ते लाेहगाव विमानतळावरून दिल्लीला रवाना हाेतील. अशाप्रकारे पाच नाेव्हेंबर राेजी राजदूतांचे शिष्टमंडळाचे दुसरे शिष्टमंडळ सीरम इन्स्टिट्यूटला भेट देईल. राजदुतांच्या या भेटीदरम्यान कडेकाेट सुरक्षा व्यवस्था पुणे विमानतळ व शिष्टमंडळाच्या प्रवास मार्गावर ठेवण्यात येणार आहे. 40 आसनक्षमता असलेल्या चार लक्झरी बसमधून हे शिष्टमंडळ पाेलीस बंदाेबस्तात आपला पुणे दाैरा पूर्ण करतील.

लस वितरणाचा तयारीचा घेतील आढावा-

'काेविशिल्ड' या लसीचे उत्पादन सीरममध्ये हाेऊन ते जगभरात वितरित केले जाणार आहे. पंतप्रधान माेदी यांच्यासह दिल्लीतील सुमारे 100 देशांचे राजदूत सीरमला 4 आणि 5 डिसेंबर राेजी भेट देऊन यासंर्दभातील माहिती घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, पंतप्रधान यांच्या दाैऱ्याबाबत अद्याप पंतप्रधान कार्यालय किंवा प्रशासकीय अधिकारी यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही; परंतु परराष्ट्र मंत्रालयाने यासंर्दभात पुणे पाेलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संर्पक करून आवश्यक ती माहिती घेतलेली आहे. 'काेविशिल्ड' या लसीचे उत्पादन नेमके कसे सुरु आहे. कशाप्रकारे लस निर्माण करण्यात आली आहे. चाचण्यांच्या अहवालाचे निष्कर्ष, लसीचे वितरण, लसीची किंमत यासंर्दभात सविस्तर माहिती घेऊन या दाैऱ्यात घेतली जाणार आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे डेप्युटी चीफ ऑफ प्राेटाॅकाॅल सर्वजीत सूदन यांनी राजदूतांच्या अधिकृत दाैऱ्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व महाराष्ट्र राज्याचे सहसचिव (प्राेटाॅकाॅल) यांना पत्राद्वारे कळवलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.