ETV Bharat / state

Ajit Pawar : अजित पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? - Leader of Opposition Ajit Pawar

दिवाळी पाडव्याच्या ( Celebrate Diwali ) निमित्ताने आज असाच एक जनार्दन ड्रायव्हर नावाचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांना गोविंद बागेत भेटायला आला होता. त्याने त्याच्या सोबत एक बोर्ड आणला होता. 'अजितदादा पवारसाहेब, महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री,' असं सदर फलकावर लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे दिवाळी पाडव्याच्या औचित्याने गोविंद बागेत आणलेल्या याच फलकाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगत आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By

Published : Oct 26, 2022, 3:48 PM IST

बारामती - संपूर्ण देशात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला ( Diwali festival is celebrated with great enthusiasm ) जातो. राजकीय क्षेत्रातील विविध दिग्गज नेते मंडळी, त्यांच्या कुटुंबियांकडूनही दिवाळी सणानिमित्त आपल्या समर्थक, चाहत्यांना शुभेच्छा देतात. बारामतीत गोविंद बागेमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) पवार कुटुंबातील इतर सदस्यांकडून साजरा केला जाणारा दिवाळी पाडवा हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच इतर राज्यातील अनेक कार्यकर्ते येत असतात.

अजित पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

दिवाळी पाडव्याच्या ( Celebrate Diwali ) निमित्ताने आज असाच एक जनार्दन ड्रायव्हर नावाचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांना गोविंद बागेत भेटायला आला होता. त्याने त्याच्या सोबत एक बोर्ड आणला होता. 'अजितदादा पवारसाहेब, महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री,' असं सदर फलकावर लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे दिवाळी पाडव्याच्या औचित्याने गोविंद बागेत आणलेल्या याच फलकाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशातील अभ्यासू राजकीय व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. सामाजिक, राजकीय, कला, क्रीडासह विविध क्षेत्रातील मान्यवराबरोबरच सर्वसामान्यांच्या भेटीसाठी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे वेळ ( sharad Pawar and family in Diwali )देतात. संपूर्ण पवार कुटूंबिय दिवाळीच्या पाडव्याला माळेगाव येथील गोविंद बाग या निवासस्थानी एकत्र येऊन पाडवा साजरा ( NCP workers gathering in Baramati ) करतात.

देशाच्या सर्वेोच्च नेत्याला जवळून पाहण्याची व त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याची सुवर्ण संधी म्हणजे दिवाळीचा पाडवा आहे. म्हणूनच मागील अनेक वर्षापासून शरद पवारांना भेटण्यासाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून हजारो लोक गोविंद बागेत ( Pawar family Diwali celebration ) येत असतात. त्या प्रत्येकाला पवारांना भेटण्यासाठी हा खास दिवस असतो.

पाडव्या दिवशी पवार कुटुंब नागरिकांशी भेटतात पाडव्या दिवशी सर्वसामान्यांसह सगे सोयरे, वेगवेगळ्या पक्षातील नेते,कार्यकर्ते त्यांना भेटायला आवर्जून येत असतात. हा दिवस खास त्यांच्यासाठी पवार कुटुंबिय देत असतात. राज्याच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांना आज सकाळी सहा वाजल्यापासूनच पवार साहेब व कुटुंबिय भेटत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या परंपरेला पवार प्रेमी ही भरभरुन प्रतिसाद देतात. यामुळेच या एका दिवसात हजारो कार्यकर्ते व लहान थोरांसह आबालवृध्द गोविंद बागेत येतात.

शरद पवारांचा व्हायरल व्हिडिओ ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar हे सोमवारी पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. परिंचे येथे शेतकरी मेळावा झाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष पुष्कर जाधव हे पवार यांना घेऊन त्यांच्या विभागीय कार्यालयात आले होते. तेव्हा जाधव यांनी पवारांना खुर्चीवर बसण्याची विनंती केली. मात्र, शरद पवार यांनी ऑफीस तुमचं, खुर्ची तुमची असे सांगून जाधव यांना खुर्चीवर नेऊन बसविले. खुद्द पवारांनी खुर्चीवर बसविल्याने त्याची चर्चा सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच बरोबर पवार हे स्वतः हा उभे राहिल्याने त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. स्वतः हा साहेब म्हणजेच शरद पवार यांनी मला खुर्चीवर नेऊन बसविले. त्याबाबतच्या भावना शब्दांत मांडता न येणाऱ्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.