पुणे : कोरेगाव-भीमा येथे शौर्यदिन साजरा होत आहे. या शौर्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय स्तंभाला मानवंदना दिली. दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातून लाखो अनुयायी कोरेगाव भीमा येथे येतात.
या वर्षीही लाखो अनुयायी कोरेगाव भीमा येथे दाखल झाले आहेत. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. मानवंदनेसाठी येणाऱ्या लोकांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 'गेट ऑफ इंडिया' येथे नयनरम्य रोषणाई
या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना कुठल्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. सर्व कार्यक्रम शांततेत पार पडेल, अशी खात्री आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.