ETV Bharat / state

लंगोट न नेसलेल्याला तुम्ही गदा दिली - अजित पवार - अजित पवार

आम्हाला नेहमी सत्काराला तलवार दिली जाते. पण तुम्ही माझा गदा देवून सन्मान केला पण मलाही कळेना आता ही गदा कशी धरावी आणि कुठे ठेवावी. पवार असे म्हणताच एकच हशा पिकला. त्यामुळे गदा ही पैलवानाच्या खांद्यावरच शोभून दिसते. दुसऱ्या कुणाच्याही खांद्यावर ती शोभत नसल्याचे पवार म्हणाले.

ajit pawar
लंगोट न नेसलेल्या अजित पवारांना तुम्ही गदा दिली - अजित पवार
author img

By

Published : Jan 27, 2020, 1:39 AM IST

Updated : Jan 27, 2020, 5:46 AM IST

पुणे - कुस्तीच्या आखाड्यात जिंकणाऱ्या पैलवानाला गदा दिली जाते, पण आज पहिल्यांदाच लंगोट न नेसलेल्या अजित पवारांना तुम्ही गदा दिली. गदा ही पैलवानाच्या खांद्यावरच शोभून दिसते. ती दुसऱ्या कुणाच्याही खांद्यावर शोभत नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. कात्रजच्या काकासाहेब कुस्ती संकुलात यंदाचा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि उपमहाराष्ट्र केसरी शैलेश काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते.

लंगोट न नेसलेल्या अजित पवारांना तुम्ही गदा दिली - अजित पवार

हेही वाचा - नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टिकेला अजित पवारांचे उत्तर, म्हणाले...

यावेळी झालेल्या कार्यक्रमात काकासाहेब पवार कुस्ती संकुलाच्यावतिने उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना पवार म्हणाले की, आम्हाला नेहमी सत्काराला तलवार दिली जाते. पण तुम्ही माझा गदा देवून सन्मान केला पण मलाही कळेना आता ही गदा कशी धरावी आणि कुठे ठेवावी. पवार असे म्हणताच एकच हशा पिकला. त्यामुळे गदा ही पैलवानाच्या खांद्यावरच शोभून दिसते. दुसऱ्या कुणाच्याही खांद्यावर ती शोभत नसल्याचे पवार म्हणाले.

हेही वाचा - मी जर शिवभोजन थाळी खाल्ली तर तुम्ही.... अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

पवार म्हणाले की, एक एक पैलवान तयार करताना किती कष्ट घ्यावे लागतात. किती खर्च करावा लागतो. याची मला जाण आहे. पराभव झाल्याने पैलवानांनी खचून जाऊ नये आणि यश मिळाले म्हणून हुरळूनही जाऊ नये. खेळात जय पराजय होत असतात, त्यात खिलाडू वृत्ती जपायची असते. यशात सातत्य ठेवायचं असतं. राज्यातील खेळ अधिक लोकप्रिय होण्यासाठी काय करता येईल, यासाठी मी क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडाराज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली.

हेही वाचा - राज्यातील आयटीआयला टाटा सामाजिक विज्ञान संस्था करणार अर्थ सहाय्य; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पालकांनाही वाटले पाहिजे की माझा मुलगा, मुलगी जरी अभ्यासात कमकुवत असला तरी एखाद्या खेळात निष्णात असावा. एखाद्या खेळात त्याने यश संपादन करावे. हे यश संपादन केल्यानंतर खेळातून बाहेर पडल्यानंतर त्याला एखादी नोकरी मिळावी, अशा पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याचा महाविकासआघाडीच्या सरकारचा प्रयत्न असेल. त्यामुळे खेळाडूंनी काळजी करू नये, असेही पवार म्हणाले.

Intro:कधीही कुस्तीचा लंगोट न नेसलेल्या अजित पवारांना गदा दिली पण ती कशी धरावी, कुठं ठेवावी...

जिंकलेल्या पैलवानाला गदा दिली जाते. परंतु आज पहिल्यांदाच कधीही कुस्तीचा लंगोट न नेसलेल्या अजित पवारांना तुम्ही गदा दिली. तलवार आम्हाला नेहमी दिली जाते... गदा दिली खरी पण मलाही कळेना तू कुठं ठेवावी, कशी धरावी. त्यामुळे गदा ही
पैलवानाच खांद्यावरच शोभून दिसते. दुसऱ्या कुणाच्याही खांद्यावर ती शोभत नसल्याचे सांगत पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानांचे स्वागत केले. कात्रज परिसरातील काकासाहेब कुस्ती संकुलात यंदाचा महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि उप महाराष्ट्र केसरी शैलेश काळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनतर केलेल्या जाहीर भाषणात ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, एक एक पैलवान तयार करताना किती कष्ट घ्यावे लागतात, किती खर्च करावा लागतो याची मला जाण आहे. पराभव झाल्याने पैलवानांनी खचून जाऊ नये आणि यश मिळालं म्हणून हुरळूनही जाऊ नये. खेळात जय पराजय होत असतात, त्यात खिलाडू वृत्ती जपायची असते. यशात सातत्य ठेवायचं असतं.

Body:राज्यातील खेळ अधिक लोकप्रिय होण्यासाठी काय करता येईल यासाठी मी क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडाराज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली. पालकांनाही वाटले पाहिजे की माझा मुलगा, मुलगी जरी अभ्यासात कमकुवत असला तरी एखाद्या खेळात निष्णात असावा. एखाद्या खेळात त्याने यश संपादन करावं. हे यश संपादन केल्यानंतर खेळातून बाहेर पडल्यानंतर त्याला एखादी नोकरी मिळावी अशा पद्धतीचा वातावरण निर्माण करण्याचा महाआघाडीच्या सरकारचा प्रयत्न असेल. त्यामुळे खेळाडूंनी काळजी करू नये.

Conclusion:पवार मंडळी कुस्तीचं मैदानही गाजवतात हे आजच समजलं.

पवार मंडळी फक्त राजकिय मैदान गाजवतात असा माझा आजवर समज होता. पण पवार मंडळी कुस्तीचं मैदानही गाजवतात हे मला आज समजलं. म्हणजे इथेही पवार काही कमी नाहीत हे पुणेकरांनी लक्षात ठेवावे असे गमतीने म्हणताच एकच हास्याची लाट उठली.

Last Updated : Jan 27, 2020, 5:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.