पुणे: पुण्यातील कसबा विधानसभा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेमध्ये बुधवारी रात्रीपर्यंत महाविकास आघाडीमध्ये अंतिम चर्चा झाली नाही. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितलेले आहे की, तुम्ही त्याचा आढावा घ्या. म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मी बोलवली असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलेली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीची बैठक आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेत आहे. त्यामध्ये पार्टीचे मत जाणून घेणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलेले आहे.
वरिष्ठ पातळीचा निर्णय मान्य: त्याचबरोबर महाविकास आघाडीचा जो वरिष्ठ पातळीचा तो निर्णय मान्य आहे. परंतु जे म्हणत आहे की, हा मतदारसंघ आमचा आहे. त्यामध्ये त्यावेळेस आम्ही आघाडीमधून हा मतदारसंघ आम्ही लढला होता. त्यामुळे आता महाविकास आघाडी झालेले वरिष्ठ आता निर्णय घेतील. तेव्हा जो निर्णय असेल तो मान्य असेल, पण तोपर्यंत तयारी म्हणून आम्ही ही बैठक घेत असल्यास अजित पवार यांनी सांगितलेले आहे.
वरिष्ठाकडून आदेश आले म्हणून बैठक: महाविकास आघाडीचा घटक म्हणून काल रात्रीपर्यंत कुठलाही निर्णय न झाल्यामुळे, आज वरिष्ठाकडून मला आदेश आले म्हणून आज बैठक घेत आहे, असे अजित दादा पवार म्हणाले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाले. त्यावेळी प्रतिक्रिया देताना सत्तेचा गैरवापर कोणी करता कामा नाही, परंतु अलीकडच्या काळात होत आहे. संविधान कायदा सर्वांसाठी समान असला असला पाहिजे, अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी मांडली आहे.
पोलीस बक्षीस योजना: कायदा सुव्यवस्था पोलीसांचे काम असते. परंतु पोलीस जर पक्ष जाहीर करत असतील, तर मग उद्या पोलीस अधिकारी कर्मचारी म्हणतील की, मला एखादी बक्षीस दिले तरच मी काम करतो. त्यामुळे पुणे पोलीसांनी बक्षीस योजना जाहीर केलेली आहे. यांसंदर्भात त्याबद्दल मी अधिकार्याकडून माहिती करेल, पण हे काही योग्य नाही. गब्बर सिंग किंवा वीरप्पन हे सापडत नाहीत, तर अशी कार्यवाही पोलीसांकडून केली जाते. परंतु प्रत्येक गोष्टीला जर बक्षीस जाहीर करायचा असेल तर, अधिकाऱ्यांना त्याविषयी विचारा अशी भूमिका सुद्धा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मांडलेली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघांमध्ये सत्यजित तांबे विजयी होण्याच्या आधीच पुण्यामध्ये मात्र त्यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. त्यांना आत्मविश्वास असेल म्हणून ते लावले असतील, अशी खोचक प्रतिक्रिया सुद्धा विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा: Sri Sri Ravi Shankar: रवीशंकर यांनी माफी मागितलीच पाहिजे, संभाजी ब्रिगेडचा इशारा, तणावात झाला रवीशंकर यांचा सत्संग