पुणे : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर विधान ( Ajit Pawar on Sambhaji Maharaj Statement ) केले. त्यांच्या विरोधात भाजप तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलने केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील याविषयी आपले मत व्यक्त करत प्रत्येकालाअभिव्यक्ती स्वातंत्र असून ज्याला धर्मवीर म्हणायचं आहे त्यांनी धर्मवीर म्हणावे. ज्याला स्वराज्यरक्षक म्हणायचे आहे त्याने स्वराज्यरक्षक म्हणावे अस म्हटल आहे. त्यावर अजित पवार यांनी पुन्हा भाष्य केले आहे.
मी माझ्या विचारांवर ठाम : उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ते धर्मवीर नाही अस म्हणणे हा एक प्रकारे संभाजी महाराज यांच्या विचारांचे द्रोह आहे असे म्हटले आहे. यावर आत्ता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की मला पुन्हा पुन्हा विषय वाढवायचे ( do not want to raise topic again ) नाहीत. काम करायचे आहे. त्यांच्या विचारांचा पगडा आणि संस्कार याला धक्का न लागता पुढे जायची आमची भूमिका आहे. मी माझ्या विचारांवर ठाम ( I stand by my thoughts ) आहे. असे यावेळी अजित पवार म्हणाले.
अजित पवार पुणे दौऱ्यावर : विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुणे दौऱ्यावर असून पवार यांचे पुणे शहराचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील केले. तसेच, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या आशायाचे स्टीकर अजित पवार यांच्या हस्ते अनेक दुचाकींना लावण्यात आले. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
तीन दिवसांनी ट्युब पेटली : यावेळी पवार पुढे म्हणाले की मी अधिवेशन काळात जे विधान केले. मी आज देखील त्यावर ठाम आहे. मी विधान केल्यानंतर त्यांची दोन तीन दिवसांनी ट्युब पेटली का ? मी कुठला शब्द आक्षेपार्ह म्हटले ते मला सांगा बर अस यावेळी पवार यांनी सांगितलं. तसच ते पुढे म्हणाले की राज्यपालांनी महापुरुषांबद्दल विधान केल्यावर कोणी काही म्हटलं नाही. पण मी काही चुकीचे म्हटले नसताना. चोराच्या उलट्या बोंबा आणि माफी मागा म्हणायला, मी काय गुन्हा केले आहे. आमच्याकडून छत्रपतींच्या विचारांशी प्रतारणा काही झाले तरी करणार नाही आणि होणार नाही. द्रोह आहे तर केस दाखल करा. असे देखील यावेळी पवार यांनी सांगितले.
औरंगजेबाबद्दल वक्तव्य : जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर पवार म्हणाले की जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबद्दल वक्तव्य केल्यानंतर त्यांनी ते तातडीने मागे घेतले. मी पण सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. पण त्यांचेच शहाणे पार औरंगजेब 'जी' म्हणायला लागले. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी खुद्द सांगितल आहे. यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की जर त्यांना तसे वाटत असेल तर सरकारने त्यांना संरक्षण द्यावे. प्रत्येकाचे संरक्षण करण कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणे हे सरकारच आणि पोलिसांचे काम असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.
लव्हजिहादबाबत कायदा व्हावा : राज्यात लव्हजिहादबाबत विविध ठिकाणी मोर्चे काढले जात असून हा कायदा व्हावा अशी मागणी केली जात आहे. यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की याबाबत कायदा करायचे असेल तर ते विधिमंडळात येणार आणि विधिमंडळात बिल आल्यानंतर राज्यातील जनतेसाठी ते बिल योग्य असेल तर आम्ही भूमिका मांडू. जर याने धर्मा धर्मात तेढ निर्माण होत असेल तसेच जाती जातीमध्ये विभाजन होत असेल तर आम्ही तशी भूमिका मांडू. पण अजून त्याबाबत बिल देखील आलेले नाही. आपण यावर चर्चा करणे उचित नाही असे देखील यावेळी पवार म्हणाले.