ETV Bharat / state

महाशिवआघाडीबाबत अद्याप काही ठरलं नाही, १९ नोव्हेंबरनंतरच निर्णय - अजित पवार - महाराष्ट्र राजकारण

बारामती तालुक्यातील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा 58वा गव्हाण पूजन व गळीत हंगामाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते रविवारी पार पडला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकारांशी बोलताना अजित पवार
author img

By

Published : Nov 17, 2019, 2:50 PM IST

पुणे - पुण्यात आज(रविवारी) होणारी बैठक ही पक्षांतर्गत आहे. पवारसाहेब नेहमीच पक्षातील नेत्यांना घेवून चर्चा करत असतात. मात्र, कशासाठी त्याची प्रसिद्धी केली जाते ते माहिती नाही. तर, आमदार फुटण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. बारामती तालुक्यातील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा 58वा गव्हाण पूजन व गळीत हंगामाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते रविवारी पार पडला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकारांशी बोलताना अजित पवार

१९ नोव्हेंबरला सोनिया गांधी आणि पवारसाहेबांच्या भेटीनंतरच सगळे चित्र स्पष्ट होईल

पवार म्हणाले, माझ्या नावानेही एक बातमी चालवली गेली. अनेकजण पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने फुटाफुट होणार नाही. काहींनी पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो हे साताऱ्यात निवडणुकीदरम्यान सगळ्यांनाच दिसले. त्यामुळे आता कुणी असे करणार नाही. तसेच कर्नाटकचा निकाल काय लागला हेही जनतेने पाहिले आहे. जर कुठल्या पक्षाने कुठल्या पक्षाचे आमदार फोडले तर इतर तिन्ही पक्ष एकत्र येवून त्यांचा पडाव करतील. महाशिवआघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. सत्ता स्थापनेबाबतही अद्याप काहीही ठरलेले नाही. याबद्दल त्या त्या पक्षाचे सर्वोच्च नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत या सर्व वावड्याच आहेत. १९ नोव्हेंबरला सोनिया गांधी आणि पवारसाहेबांच्या भेटीनंतरच सगळे चित्र स्पष्ट होईल असे ते म्हणाले.

हेही वाचा - ...अखेर तो नरभक्षक बिबट्या जेरबंद; तब्बल १५ दिवसानंतर वनविभागाला यश

पीक नुकसानीकरता शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. प्रत्यक्ष नुकसान पाहून मदत दिली पाहिजे. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट आहे त्यामुळे सगळे निर्णय केंद्रातून होतात. या पार्श्वभूमीवर आमचे सगळे खासदार याबद्दल केंद्रात आवाज उठवून शेतकऱ्यांना दिलासा देतील, असे पवार म्हणाले.

आघाडीबाबत बोलताना, भाजपनं काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. आज त्यांच्याकडे बहुमत असताना त्यांनी सत्ता स्थापन केली नाही. आम्ही विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत होतो. मात्र, आता राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर सत्तेबाबत मार्ग काढता येतोय का याबद्दल सगळेच प्रयत्न करत आहेत. मात्र, जोपर्यंत १४५ च्या पुढे आकडा जात नाही तोपर्यंत गोड बातमी येणार नाही. आणि तोपर्यंत आपल्याला राष्ट्रपती राजवटीतच रहावं लागेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - डाळींबावर बुरशीचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांवर बहर सोडून देण्याची वेळ

Intro:Body:
बारामती....
आमदार फुटण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही.
अजित पवार

- पुण्यात आज होणारी बैठक ही पक्षांतर्गत आहे. पवारसाहेब नेहमीच पक्षातील नेत्यांना घेवून चर्चा करत असतात.. कशासाठी त्याची प्रसिद्धी केली जाते ते माहिती नाही.आमदार फुटण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले..
बारामती तालुक्यातील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा 58वा गव्हाण पूजन व गळीत हंगामाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडला यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

पुढे पवार म्हणाले की ,माझ्या नावानेही एक बातमी चालवली गेली.. अनेकजण पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने फुटाफुट होणार नाही.. काहींनी पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो हे साताऱ्यात सगळ्यांना दिसलंय.. त्यामुळे आता कुणी असं करणार नाही.. कर्नाटकचा निकाल काय लागला हेही जनतेने पाहिले आहे.. जर कुठल्या पक्षाने कुठल्या पक्षाचे आमदार फोडले तर इतर तिन्ही पक्ष एकत्र येवून त्यांचा पाडाव करतील.फॉर्म्युला ठरला याबद्दलच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही.. अद्याप काहीही ठरलेलं नाही.. याबद्दल त्या त्या पक्षाचे सर्वोच्च नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत या वावड्याच.. आता १९ नोव्हेंबरला सोनिया गांधी आणि पवारसाहेबांची भेट होईल.. त्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल असे ते म्हणाले...

-आता शेतकऱ्यांना दिलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे.. प्रत्यक्ष नुकसान पाहून मदत दिली पाहिजे.. सध्या राष्ट्रपती राजवट आहे.. त्यामुळे सगळे निर्णय केंद्रातून होतात.. या पार्श्वभूमीवर आमचे सगळे खासदार याबद्दल केंद्रात आवाज उठवून शेतकऱ्यांना दिलासा देतील..
- भाजपनं काय बोलावं हा त्यांचा प्रश्न.. आज त्यांच्याकडे बहुमत असताना त्यांनी सत्ता स्थापन केली नाही.. आम्ही विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत होतो.. मात्र आता राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर सत्तेबाबत मार्ग काढता येतोय का याबद्दल सगळेच प्रयत्न करतायत..
- जोपर्यंत १४५ च्या पुढे आकडा होत नाही तोपर्यंत गोड बातमी येणार नाही.. आणि तोपर्यंत आपल्याला राष्ट्रपती राजवटीतच आपल्याला रहावं लागेल.. असे पवार यांनी स्पष्ट केले...
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.