पुणे : पुण्यात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने लव्ह जिहाद, गोहत्या,छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. नेहमी सार्वजनिक कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार हे कुंकू लावत नसल्याचे दिसून येतात. पण काल पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात एका लहान मुलीच्या हट्टापायी अजित पवार यांनी कुंकू लावल्याच पाहायला मिळालं.
चिमुरडीचा हट्ट पुरवला : अजित पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या कार्यक्रमाला आले असताना कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी एसकेडी ग्रुप च्या कार्यालयाला भेट दिली. या भेटीत पवार हे कार्यालयात आल्यानंतर सुभाष गव्हाणे यांची तीन वर्षीय क्रीतिका हिने पवार यांना ओवाळून झाल्यानंतर तिने दादांना कुंकू लावायला हात पुढे केला.
चिमुरडीने लावला कुंकू : अजित पवारांनी मला एलर्जी असल्याचे चिमुरडीला सांगितले. पण समोर उभी असलेल्या निरागस मुलीकडे पाहून दादा म्हटले लावून टाक आणि त्या छोट्याश्या मुलीने अजित पवार यांना कुंकू लावून औक्षण केले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून पवार यांचा दुसरा रूप देखील आता पाहायला मिळत आहे.