पुणे - राज्यातील जनतेच्या जीवनाशी खेळणाऱ्या दूध भेसळखोरांना लाज वाटत नाही. त्यामुळे दूधात भेसळ करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होणे गरजेचे असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. बारामती येथील एका आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.
मागे मी मंत्रिमंडळात असलेल्या सरकारच्या काळात दुधात भेसळ करणार्यांना फाशीची शिक्षा देता येईल, असे कलम लावण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र, तत्कालीन काळात राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली नसल्यामुळे कायद्यात बदल होऊ शकला नाही, असे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - 'मुलींसाठी लष्कर सुरक्षित क्षेत्र, मराठी मुलींनी लष्करात यावे'
यावेळी पवार म्हणाले, भेसळ केलेले दूध जीवघेणे आहे. मुंबईमध्ये ओढे, नाले वाहणार्या पाण्यात भाज्या धुतल्या जातात. ज्या पाण्यात जंतूही जिवंत राहत नाही, अशा पाण्यात भाज्या धुतल्या जातात. महानगरात दूधाची विक्री अधिक होते. त्यामुळे भेसळखोर मोठ्या प्रमाणात भेसळ करत असतात. त्यामुळे या भेसळखोरांना फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे, असे पवार म्हणाले.
हेही वाचा - लग्नात विघ्न..! फटाक्यांमुळे लागली भीषण आग, चार वाहने भस्मसात