ETV Bharat / state

पुण्यात तब्बल १८ वर्षांच्या वैद्यकीय संघर्षानंतर दाम्पत्याला अपत्य प्राप्ती - maharashtra

एका जोडप्याला त्यांच्या १८ वर्षांच्या वैद्यकीय संघर्षानंतर नवव्या प्रयत्नामध्ये अपत्यप्राप्ती झाली आहे. बाळाच्या आगमनामुळे आमचे कुटुंब परिपूर्ण झाले आहे, अशी भावना बाळाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

डॉ. राजेश्वरी पवार
author img

By

Published : May 31, 2019, 1:44 PM IST

पुणे - शहरातील खराडी येथील मदरहुड रुग्णालयामध्ये एका जोडप्याला त्यांच्या १८ वर्षांच्या वैद्यकीय संघर्षानंतर नवव्या प्रयत्नामध्ये अपत्यप्राप्ती झाली आहे.
संबंधित दाम्पत्याने यापूर्वी अनेकदा बाळासाठी दिल्ली आणि पुण्यामध्ये विविध ठिकाणी मेडिकल ट्रीटमेंटही घेतली होती. मात्र, सर्व्हायकल इनकॉम्पिटन्समुळे गर्भवस्था पार करण्यात काही समस्या निर्माण होता होत्या, अशी माहिती रुग्णालयाच्या प्रसुतीतज्ञ डॉ. राजेश्वरी पवार यांनी दिली.

दरम्यान बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. बाळाच्या आगमनामुळे आमचे कुटुंब परिपूर्ण झाले आहे, अशी भावना बाळाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

डॉ. राजेश्वरी पवार

सर्व्हायकल इनकॉम्पिटन्स काय आहे?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सर्व्हायकल इनकॉम्पिटन्स ही समस्या सर्वसाधारणपणे १ टक्का महिलांमध्ये आढळून येते. ही समस्या निर्माण होण्याचे नेमके असे कोणते कारण सांगता येत नाही. यावर गर्भावस्थेत स्त्रीच्या मेडिकल हिस्टरीनुसार उपचार करून बाळाला यशस्वीरित्या जन्म देणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी गर्भावस्थेत स्त्रीला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे आहे.

Intro:पुणे - खराडी येथील मदरहुड हॉस्पिटलमध्ये एका जोडप्याला त्यांच्या 18 वर्षांच्या वैद्यकीय संघर्षानंतर आणि नवव्या प्रयत्नामध्ये अपत्यप्राप्ती झाली आहे.

Body:यासंदर्भात रुग्णालयाच्या प्रसुतीतज्ञ डॉ. राजेश्वरी पवार म्हणाल्या की, संबंधित दांपत्याने यापूर्वी अनेकदा बाळासाठी प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी दिल्ली आणि पुण्यामध्ये विविध ठिकाणी मेडिकल ट्रीटमेंट ही घेतली होती. मात्र, सर्व्हायकल इनकॉम्पिटन्समुळे गर्भवस्था पार करण्यात काही समस्या निर्माण होता होत्या.

त्यामुळे प्रसूती लांबवणे हे आमचे उदिष्ठ होते. कारण जगातील कोणत्याही इन्क्युबेटरपेक्षा गर्भाशय हे सर्वोत्तम इन्क्युबेटर असते. पण भ्रूणाचे संरक्षण करण्यासाठी पाणी नसल्याने बाळाला संसर्ग होणार नाही आणि इतर कोणतीही गुंतागुंत होणार नाही याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर 30 व्या आठवड्यात प्रसूती करण्यात आली असून, बाळ आणि आई दोघेही आता सुखरूप आहेत.

दरम्यान, बाळाच्या आगमनामुळे आमचे कुटुंब परिपूर्ण झाले आहे अशी भावना बाळाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. त्याप्रमाणेच डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल बाळाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सर्व्हायकल इनकॉम्पिटन्स ही समस्या सर्वसाधारणपणे 1 टक्का महिलांमध्ये आढळून येते. ही समस्या निर्माण होण्याचे नेमके असे कोणते कारण सांगता येणार नाही. मात्र, गर्भावस्थेत स्त्रीच्या मेडिकल हिस्टरीनुसार उपचार करून बाळाला यशस्वीरित्या जन्म देणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी गर्भावस्थेत स्त्रीला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे असल्याचेही तज्ञांनी सांगितले आहे.

Byte Sent on Mojo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.