ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : शरद पवारांची जिरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठावंताची जिरणार? - Navnath Parkhi written letter to Devendra Fadnavis

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड पुकारत अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी काल शिंदे फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. त्यावर भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे पाच प्रश्न विचारले आहेत. कालच्या शपथविधीमुळे भाजपची की, राष्ट्रवादीची ताकद वाढणार? असा पहिला प्रश्न नवनाथ पारखी यांनी फडणवीसांना विचारला आहे.

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis
author img

By

Published : Jul 4, 2023, 5:55 PM IST

Updated : Jul 4, 2023, 6:24 PM IST

नवनाथ पारखी यांचे भावनिक पत्र

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड पुकारत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी काल शिंदे फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. तसेच मंत्रिपदाची शपथ देखील घेतली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले, तर काही आमदार शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात आले. यामागे भारतीय जनता पक्षाचे नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस यांची ही गुगली निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी करणारी असल्याची चर्चा आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांवर अजित पवारांच्या बंडामुळे अन्याय होत असल्याचा सुर आता उमटत आहे. यावर पुणे ग्रामीण भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी यांनी फडणवीस यांना पत्राद्वारे पाच प्रश्न विचारले आहेत.

Pune Rural BJP Yuva Morcha Navnath Parkhi
नवनाथ पारखी यांचे फडणवीसांना पत्र

पवारांची जिरवण्याच्या नादात भाजपची जिरणार : कालच्या शपथविधीमुळे भाजपची की, राष्ट्रवादीची ताकद वाढणार? असा पहिला प्रश्न नवनाथ पारखी यांनी फडणवीसांना विचारला आहे. पवारांची जिरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठावंतांची जिरणार का असा सवाल देखील पारखी यांनी विचारला आहे. भाजप वाढवण्यासाठी अनेक कार्यकर्ते काम करतात, त्याच्यासाठी तुम्ही काही दुसरी व्यावस्था केली का? असा थेट सवाल त्यांनी फडणवीसांना विचारला आहे. पारखी यांनी या पत्राद्वारे फडणवीस यांना पाच प्रश्न विचारले आहेत. साहेब, जमल्यास उत्तर द्या, अशी साद पारखी यांनी घालत आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता काय करायचे, असा सवाल फडणवीसांना केला आहे.

भाजप आमदारांचे काय? : या पत्रामुळे नवनाथ पारखी यांनी अजित पवारांना सत्तेत समाविष्ट करून घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार की भाजपची ताकद वाढवणार? असा थेट सवाल केला आहे. तुम्ही आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांचे पालक आहात, मग आम्हाला सक्षम करणे तुमचे काम नाही.? असा देखील पारखी म्हणाले. वेळ पडेल त्यावेळेस जेवणाची शिदोरी सोबत घेवून आम्ही पक्षाचा प्रचार, प्रसार केला आहे मग आमच्या सारख्या कार्यकत्याचे संघटनेत महत्व काय.? मोठ्यां साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठावान कार्यकत्यांची तर जिरणार नाही ना..? भाजपचे मंत्री पदाच्या शर्यतीतील सहयोगी आमदार नेत्यांचे काय? ज्यांनी आजवर पक्षासाठी खुप काही केले असे प्रश्न पारखी यांनी फडणवीस यांना पत्राद्वारे केले आहेत.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी कोणाची? खरा प्रतोद कोण? विधानसभा अध्यक्ष म्हणतात...

Last Updated : Jul 4, 2023, 6:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.