पुणे : राज्यात वेदांत फॉक्सकॉन पाठोपाठ आता एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातला गेला आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून शिंदे सरकारवर टिका केली जात (Aditya Thackeray criticized Shinde government) आहे. यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यावर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिले (Aditya Thackeray on Airbus project) आहे. ते म्हणाले की- काल त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. आज दिली आहे. जस त्यांना वेदांतबाबत माहीत नव्हते, तस एअरबसबाबत देखील माहीत नसेल. त्यांनी एका वृत्तवाहिनीत म्हटले आहे की- एअरबस हा प्रकल्प आम्ही राज्यात आणू. मग त्यांनी राज्याशी आणि राज्यातील जनतेशी गद्दारी का केली ? राज्याचे मंत्री का खोटं बोलत आहे? अशी टीका यावेळी ठाकरे यांनी केली.
चौथा प्रकल्प राज्याबाहेर : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की- हा चौथा प्रकल्प होता जो राज्यातून निघून गेला. मी या प्रकल्पासाठी 3 ते 4 महिन्यापासून सांगत आहे, की यासाठी प्रयत्न करावे. तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री म्हणाले की- एअरबस प्रकल्प (Airbus project) आम्ही महाराष्ट्रात आणुच, पण तो प्रकल्प आता राज्यातून निघून गेला.
खोके सरकारवर विश्वास नाही : यावेळी ठाकरे यांनी सरकार समोर एक प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की 4 प्रकल्प राज्यातून निघून गेले आहे. सुभाष देसाई उद्योग मंत्री असताना त्यांनी इज ऑफ कंप्लायनसाठी एक समिती तयार करण्यात आली होती. ही समिती राज्यात जे उद्योग आहे, ते तरी या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ नये. यासाठी ती समिती तयार करण्यात आली होती. या समितीची अजूनही तीन महिन्यात एकही बैठक झाली नाही. या खोके सरकारवर राज्यातील कुठल्याही उद्योजकाचा विश्वास बसलेला नाही. म्हणून प्रत्येक उद्योग हे आपल्या राज्यातून बाहेर जात आहे. असे देखील यावेळी ठाकरे (Aditya Thackeray on Airbus project) म्हणाले.
लोकांचे प्रश्न सोडवण्याकडे भर : आज सामनामध्ये जो अग्रलेख आला आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की -राज्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजकारण संपून कुठेतरी विकास कामांवर लक्ष दिले पाहिजे. राजकारण हे चालूच असते, पण आत्ता लोकांच्या हिताचे कामे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याकडे भर दिला पाहिजे.
देशाचे नागरिक म्हणून कौतुक : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी मध्यंतरी पुण्यात येऊन उद्योजकांना त्यांच्या राज्यात निमंत्रित केले. यावर आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की - देशाचे नागरिक म्हणून मी त्यांचे कौतुक करेल. पण आपले मुख्यमंत्री जर बघितल तर मंडळे, दहीहंडी, राजकीय भेटी. फोडाफोडी, सोडून दुसऱ्या कोणत्याही राज्यात ते गेले नाही. देशातील अनेक मुख्यमंत्री विविध राज्यात जाऊन उद्योग आपल्या राज्यात येण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण आपले मुख्यमंत्री गेल्या तीन महिन्यात एकदाही इतर राज्यात जाऊन प्रयत्न केला (Aditya Thackeray criticized) नाहीये.
काल पुन्हा राज्यात खातेवाटप : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावर ठाकरे यांना विचारल असता ते म्हणाले की- मी त्यांच्या बरोबर बसत नाही. आणि त्यांनी जे जिल्हाधिकाऱ्यांना विचारले ते मी घेत नाही. म्हणून त्यांना वाईट वाटत असेल, आपण पाहिलं तर काल पुन्हा राज्यात खातेवाटप बदलले उद्योग मंत्री आणि कृषी बाबत माहिती दिली. आणि कृषी मंत्री आणि एकसाईस बाबत माहिती दिली. असा टोला देखील ठाकरे यांनी लगावला.