ETV Bharat / state

पूरग्रस्तांच्या मदतीला भैरवनाथ पतसंस्थेचा हातभार; आढळरावांनी पाठवली जीवनावश्यक वस्तूंची मदत

सामाजिक बांधिलकीतून उत्तर पुणे जिल्ह्यात पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर अनेकांचे मदत हात पुढे येत असुन प्रत्येकजण जमेल तशी मदत पूरग्रस्तांना करण्याचा प्रयत्न करत आहे. यात भैरवनाथ पतसंस्था व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या माध्यमातून रविवारी सातारा, सांगली, कोल्हापूर येथे पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली आहे.

हातभार
author img

By

Published : Aug 11, 2019, 11:55 PM IST

पुणे - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उत्तर पुणे जिल्ह्यातून आता मदतीचा ओग वाढला असताना भैरवनाथ पतसंस्था आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या माध्यमातून रविवारी सातारा, सांगली, कोल्हापूर येथे पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली आहे. कुठलेही राजकारण आणि निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता ही मदत करत असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.

पूरग्रस्तांच्या मदतीला भैरवनाथ पतसंस्था व आढळराव पाटलांचा हातभार

पूरग्रस्तांसाठी पाणी बॉक्स, बिस्किट, ब्लँकेट, साड्या, टी-शर्ट, स्वेटर, लहान मुलांचे व मुलींचे कपडे, पोहे, तांदूळ, गहू, साखर, डाळ, मुलांचे शाळेतील दप्तर, मेडिकल किट, स्मोकलेस स्मार्ट स्टोव्ह, फरसाण इत्यादी वस्तू देण्यात आल्या. तसेच, भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ आणि भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने रोख मदत करण्यात आली आहे. या सोबतच, लांडेवाडी येथील शाळकरी मुलांनी स्वत:च्या खाऊच्या पैशात बचत करुन काही प्रमाणात यामध्ये मदत दिली असून, हे सर्व मदतीचे साहित्य प्रांताधिकारी संजय पाटील यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे.

सामाजिक बांधिलकीतून उत्तर पुणे जिल्ह्यात पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर अनेकांचे हात मदतीसाठी पुढे येत असून, प्रत्येकजण जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.

Intro:Anc__पुरग्रस्तांच्या मदतीसाठी उत्तर पुणे जिल्ह्यातुन आता मदतीचा ओग वाढला असताना भैरवनाथ पतसंस्था व माजी खासदार शिवाजी आढळरावपाटील यांच्या माध्यमातून आज सातारा,सांगली,कोल्हापूर येथे पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली आहे मात्र या मदतीतुन कुठलेही राजकारण व निवडणूका डोळ्यासमोर न ठेवता हि मदत करत असल्याचे आढळरावपाटील यांनी सांगितले..

पूरग्रस्तांसाठी पाणी बॉक्स, बिस्किट ,ब्लेंकेट ,साडी ,टी-शर्ट ,स्वेटर, लहान मुलांचे व मुलींचे कपडे, पोहे ,तांदूळ, गहू ,साखर, डाळ, मुलांचे शाळेतील दप्तर, मेडिकल किट, स्मोकेलेस स्मार्ट स्टोह, फरसाण व भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था सर्व कर्मचाऱ्यांचे वतीने रोख मदत व लांडेवाडी येथील शाळकरी मुलांनी स्वतच्या खाऊच्या पैशात बचत करुन काही प्रमाणात यामध्ये मदत दिली असुन हे सर्व मदतीचे साहित्य प्रांताधिकारी संजय पाटील यांच्या मार्फत पाठविण्यात आली आहे

सामाजिक बांधिलकीतुन उत्तर पुणे जिल्ह्यात पुरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर अनेकांचे मदत हात पुढे येत असुन प्रत्येकजण जमेल तशी मदत पुरग्रस्तांना करण्याचा प्रयत्न करत आहेBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.