ETV Bharat / state

Vikram Gokhale Passed Away : अभिनयाचा समृद्ध वारसा लाभलेला तारा निखळला, विक्रम गोखले यांचे निधन - विक्रम गोखले

चित्रपटसृष्टील दिग्गज अभिनेता विक्रम गोखले यांनी आज अखेरचा श्वास ( Vikram Gokhale Passed Away ) घेतला. अभिनेते विक्रम गोखले ( Vikram Gokhale ) यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी पुण्यात निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ( Dinanath Mangeshkar Hospital ) उपचार घेत होते.

Vikram Gokhale Passed Away
Vikram Gokhale Passed Away
author img

By

Published : Nov 26, 2022, 2:43 PM IST

Updated : Nov 26, 2022, 4:05 PM IST

पुणे - अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन ( Vikram Gokhale Passed Away ) झाले आहे. रंगभूमी आणि भारतीय चित्रपटसृष्टील दिग्गज अभिनेता विक्रम गोखले यांनी आज अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून ते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ( Dinanath Mangeshkar Hospital ) उपचार घेत होते. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

विक्रम गोखले यांचे निधन

अभिनयाचा वारसा मिळाला बालपणी - विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या बालपणीच मिळाला. त्याच्या पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले असा तीन पिढय़ांपासून अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केले. गेली सात दशके ते नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सिरीज अशा सर्वक्षेत्रात कार्यरत होते.

Vikram Gokhale Passed Away
विक्रम गोखले यांचे निधन

अभिनयासह केले लेखन - अलिकडेच त्यांनी आपल्या कारकिर्दीवर लेखन करण्याचा निर्णय घेतला होता. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, ''माझ्या अभिनय कारकीर्दीमध्ये आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांना मी शब्दरूप देत आहे. या अनुभवांनी मला खूप काही शिकविले. माझ्या जडणघडणीमध्ये योगदान देणारे रणजित देसाई, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, सुरेश खरे, शेखर ढवळीकर, विजया मेहता अशा मान्यवरांसह माझ्यासमवेत काम करणारे सहकलाकार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. कलाकार म्हणून मी कसा घडत गेलो, वाचन आणि अभ्यासातून स्वत:ला कसा घडवत गेलो याचा पट मांडण्याचा हा प्रयत्न आहे. नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका असे स्वतंत्र विभाग असतील. वेब मालिका या नव्या माध्यमासह अध्यापन क्षेत्रात मी केलेल्या कामातून आलेले अनुभव सध्या मी लिहीत आहे.''

गोदावरी अखेरचा मराठी चित्रपट - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गोदावरी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. हा त्यांचा अखेरचा मराठी चित्रपट ठरला. त्यांचा निकम्मा हा चित्रपट यंदा जूनमध्ये प्रदर्शित झाला होता. एबी आणि सीडी हा २०२० मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटात विक्रम गोखले यांनी अमिताभ बच्चनसोबत मराठी चित्रपटात काम केले होते.

विक्रम गोखले प्रसिद्ध चित्रपट - मिशन मंगल, हिचकी, अय्यारी, चॅम्पियन, अब तक छप्पन 2, भूल भुलैया, हे राम, हम दिल दे चुके सनम, वजीर, कैद में है बुलबुल, खुदा गवाह, धरम संकट , क्रोध, अग्निपथ, ये है जिंदगी , स्वर्ग नरक , प्रेम बंधन , इन्साफ , सलीम लंगडे पे मत रो, ईश्वर, थोडासा रूमानी हो जायें अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटात त्यांनी चरित्र अभिनेत्यांच्या भूमिका साकारल्या.

केसरी, गोदावरी (२०२१), प्रवास (२०२०), AB Aani CD (2020) दुसरी गोष्ट (२०१४) , आम्ही बोलतो मराठी (२०१४), धुमाकूळ! (२०१४ , अनुमती (२०१३), मिशन 11 जुलै (2010) आघात (2010) दे दना दन (2009), लाइफ पार्टनर (2009), उन्हाळा (2007) लपंडाव (1993), माहेरची साडी (१९९१), कळत नकळत (1991), विवेक (1985), महानंदा (1985), सती नाग कन्या (१९८३), दरोडेखोर (1980), भिंगरी (१९७७), बाळा गाऊ कशी अंगाई (१९७७), वऱ्हाडी आणि वाजंत्री (1973) अशा गालेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

Last Updated : Nov 26, 2022, 4:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.