ETV Bharat / state

..तर 60 वर्षांपुढील राजकारण्यांनीही राजीनामा द्यावा; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचा खोचक सल्ला

महाराष्ट्र सरकार याबाबतचा कायदा करणार असल्याचे बोलले जात आहे. ते चुकीचे आहे. त्यामुळे असा कायदा आणण्याआधी राजकारणातील 60 वर्षांपुढील नेत्यांनी राजीनामे द्यावे. त्यांनी आधी निवृत्त व्हावे, असा खोचक सल्ला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दिला आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले
author img

By

Published : Jul 26, 2020, 12:15 PM IST

पुणे - लॉकडाऊनदरम्यान ठप्प झालेल्या चित्रपटसृष्टीतील कामे पुन्हा सुरू झाली आहेत. राज्य सरकारने काही अटी शर्तींच्या अधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे. मात्र, 65 वर्षावरील कलाकारांना सेटवर काम करता येणार नाही, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. या सूचनेनंतर महाराष्ट्र सरकार याबाबतचा कायदा करणार असल्याचे बोलले जात आहे. ते चुकीचे आहे. त्यामुळे असा कायदा आणण्याआधी राजकारणातील 60 वर्षांपुढील नेत्यांनी राजीनामे द्यावे. त्यांनी आधी निवृत्त व्हावे, असा खोचक सल्ला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दिला आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले

राज्य सरकारने कायदा केल्यास ज्येष्ठ कलाकार भिकेला लागतील. 65 वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्याला सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणीही विक्रम गोखले यांनी केली आहे.जवळपास तीन महिन्यांच्या लॉकडाउनंतर सरकारने काही अटी-शर्तींसह चित्रीकरणाला सुरुवात करण्यास परवानगी दिली. मात्र, काही नियमांमुळे ज्येष्ठ कलाकार व निर्मात्यांची चांगलीच गोची झाली आहे. ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी विक्रम गोखलेंनी केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार यावर फेरविचार करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आज असे कितीतरी लोक आहेत जे ६५ वर्षानंतरही चांगलं काम करत आहेत. त्यांनी आत्ता काय करायचं. त्यांच्या आयुष्यभरासाठी सरकार त्यांना मदत करणार आहे का. शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याचा अधिकार मला घटनेने दिला आहे आणि मी ते करेल. आरोग्याविषयी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन आम्ही करत आहोत. आज कितीतरी लोक आम्ही कामावर येण्याची वाट पाहत आहेत. राज्य सरकार जर 65 वर्षांवरील कलाकारांना सेटवर काम करता येणार नाही हा कायदा करत असेल तर त्याला मी तीव्र विरोध करतो, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.