पुणे - महिलांवरील अत्याचारांबाबत ऐकले की मनस्ताप होतो. सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. त्यांच्या काळातील कायदे आता लागू केले पाहिजे, तसे करण्याची आता खरी गरज आहे, अशा शब्दात अभिनेते शरद पोंक्षे यांनी रोष व्यक्त केला. ते पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा - हिंगणघाटची पुनरावृत्ती : लासलगाव बस स्थानकात महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 'हैदराबाद पोलिसांनी जे केले ते उत्तम होते. निर्भया प्रकरणी आरोपींना सोडा म्हणून सांगण्यात येत आहे. त्यांची फाशी रद्द करण्याच्या मागणीला आता जोर यायला लागला आहे' अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. महिलांवरील अत्याचार प्रकरणी संपूर्ण देशात एन्काऊंटर झाले पाहिजे, आरोपींना तत्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.