ETV Bharat / state

पिंपरीत 80 तळीरामांवर कारवाई; चलनातून एका दिवसात 12 लाखाहून दंड - पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज

यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मद्यपान करणाऱ्या वाहन चालकांची रक्ताची चाचणी घेऊन त्यात अल्कोहोल आहे की नाही, हे तपासल्यानंतरच तळीरामांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा अंदाजे 80 ते 100 जणांवर पोलिसांनी कठोर पाउल उचलत मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल कारवाई केली आहे.

पिंपरीत 80 तळीरामांवर कारवाई
पिंपरीत 80 तळीरामांवर कारवाई
author img

By

Published : Jan 1, 2021, 7:09 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - न्यू इयर सेलिब्रेशनच्या नावाखाली 31 डिसेंबरला मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या 80 तळीरामांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. यातील, 55 जणांवर प्रतिबंधात्मक तर, 3 हजार 340 जणांवर चलन कारवाई करण्यात आली आहे. यातून अंदाजे 12 लाख 78 हजारांचा चलन दंड वाहन चालकांना ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई 31 डिसेंबर 2020 रात्रीच्या सुमारास करण्यात आली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पिंपरीत 80 तळीरामांवर कारवाई; चलनातून एका दिवसात 12 लाखाहून दंड
यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मद्यपान करणाऱ्या वाहन चालकांची रक्ताची चाचणी घेऊन त्यात अल्कोहोल आहे की नाही, हे तपासल्यानंतरच तळीरामांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा अंदाजे 80 ते 100 जणांवर पोलिसांनी कठोर पाउल उचलत मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल कारवाई केली आहे. 31 डिसेंबर निमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आठ रुग्णवाहिका विविध भागात तैनात केल्या होत्या.

हेही वाचा - नागपूर: गस्ती नौका ठेवणार माशांच्या चोरीवर लक्ष

80 तळीरामांवर पोलिसांनी कारवाई

निगडी पोलिसांनी 19, आळंदी 7, वाकड 3, चिखली 1 अशा 30 कारवाया पोलिसांनी तर 50 कारवाया वाहतूक पोलिसांनी केल्या. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 80 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली.

55 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी 5, भोसरी 3, आळंदी, दिघी प्रत्येकी एक, हिंजवडी 39, देहूरोड, शिरगाव आणि म्हाळुंगे पोलिसांनी प्रत्येकी दोन अशा 55 प्रतिबंधात्मक कारवाया केल्या.

3 हजार 292 जणांवर चलन कारवाई; 12 लाखांचा दंड वसूल होण्याची शक्यता

वाहतूक पोलिसांनी चलन कारवाया मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. 31 डिसेंबर रोजी तीन हजार 292 जणांवर वाहतूक पोलिसांनी चलन कारवाई केली. त्यात अंदाजे 12 लाख 78 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा - नववर्ष सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर चिखलदरा पर्यटकांच्या गर्दीने फुलले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.