पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या तीन महिन्यापासून प्रशासनाने दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या 16 हजार 459 जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कोरोनामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकूण ३६० कंटेन्मेंट झोन करण्यात आले होते. या सर्व ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लॉकडाऊन काळात मास्क न वापराने, सोशल डिस्टन्स न पाळणे आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाव्यतिरिक्त दुकाने अधिक वेळ खुली ठेवणे अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. शहरात नियमांची पायमल्ली करणारे तब्बल १६ हजार ४५९ नागरिक सापडले आहेत, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊच्या काही अटी आणि नियम शिथिल करण्यात आले आहेत. बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर शहरातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे.